शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गव्हाचा भरपूर साठा, मात्र ज्वारीची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 21:39 IST

अतिपावसाचा परिणाम : शासकीय गोदामांमध्ये गहू, तांदूळ पुरेसा उपलब्ध

जळगाव : आॅक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा धान्य, कडधान्याची सर्वांनाच चिंता आहे, असे असले तरी शासकीय गोदामांमध्ये पुरेसा गहू, तांदूळ उपलब्ध असल्याने त्याची चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ज्वारी काळी पडल्याने ती खरेदी केली जाणार नसल्याने ज्वारीची चणचण भासणार असल्याचे संकेत दिले जात आहे.आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे कापूस, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात ७ लाख ३ हजार ७८७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. राज्यभरातही असे सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसानीचे चित्र आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असून उत्पादन खर्चही कसा निघेल, या चिंतेत तो आहे. बळीराजासोबतच नोकरदार, व्यावसायिक सर्वांनाच महागाई भडकण्याची चिंता आहे. यात मुख्यत्वे करून धान्याची व कडधान्याची चिंता आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढण्यासह धान्याची उपलब्धता कशी असेल, याचा सर्वच विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर धान्य साठ्याचा आढावा घेतला तर यामध्ये भारतीय अन्न महामंडळाकडून सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी पुरेसा पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.साठ्याची चिंता नाहीभारतीय अन्न महामंडळाच्या मनमाड येथील केंद्रावरून जळगाव जिल्ह्याला सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी धान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये सदर केंद्रावर पुरेसा गहू व तांदळाचा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. भारतीय अन्न महामंडळाकडे देशभरातून धान्याचा साठा येत असतो. त्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान व इतर ठिकाणाहून आलेला गेल्या वर्षाचा गव्हाचा साठा असल्याची माहिती मिळाली.दरमहा एक लाख क्विंटल गहू तर ५५ हजार क्विंटल तांदळाची आवश्यकताजळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने डिसेंबर महिन्यासाठी एकूण ९९ हजार ६५९ क्विंटल गव्हाची तर ५४ हजार २३७ हजार क्विंटल तांदळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे नियतन उपलब्ध होणार असून दरमहा सरासरी एवढाच साठा जिल्ह्यासाठी आवश्यक असतो. त्यानुसार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ हा साठा भारतीय अन्न महामंडळाकडून उपलब्ध होऊ शकणार आहे. यात विशेष म्हणजे रब्बी हंगामात गव्हाची अद्याप लागवड होणे बाकी असून रब्बीचे क्षेत्र वाढणार असल्याने यंदाही गहू मोठ्या प्रमाणात येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव