बोदवड : तालुका कृषी विभागात सध्या प्रभारीराज सुरू आहे. त्यात सोमवारी या कार्यालयाची किल्लीच हरविल्याने कामावर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ताटकळत बाहेरच उभे राहावे लागले. तासाभराने कुलूप तोडून कार्यालय उघडता आले.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ११ वाजता शहरातील स्टेशन रोडवरील शालिमार चित्रपट गृहाच्या पाठीमागे असलेल्या तालुका कृषी कार्यालयात काही शेतकरी कामानिमित्त गेले असता कार्यालयाच्या गेटचे कुलूप कोणीतरी करवतने कापत असल्याचे त्यांना दिसून आले असता, त्यांनी हे कुलूप का तोडत आहे, अशी विचारणा केली असता, आम्ही येथील कर्मचारी असून, या कुलूपाची चावी दिसत नसल्याने कुलूप तोडावे लागत असल्याचे संबंधितांनी सांगितले. काही वेळातच हळूहळू मंडळ अधिकारी, कार्यालय कर्मचारी आले. कुलूप तोडल्यावर सर्व कर्मचारी आत गेले व कामास लागले; परंतु या प्रसंगाची दिवसभर चर्चा राहिली. याबाबत कार्यालय सुपरवायझर एस. एन. चौधरी यांची प्रतिक्रिया घेतली असता, मिळालेली माहिती अशी की, कार्यालयाची एकच चावी असून, बाजूच्या घरात चावी ठेवली जाते; परंतु शेजारी असलेले लोक हे सकाळी शेतात निघून गेल्याने कुलूप तोडावे लागले.
कुलूप कापत असताना कर्मचारी. (छाया : गोपाल व्यास)