शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राशीच्या कपाशीची बोण्ड गळती शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 17:49 IST

कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देतक्रारीनंतर कृषी अधीक्षकांनी केली पाहणी 

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी व राष्ट्रीय किसान मोर्चाचे विभागीय अध्यक्ष हिरालाल केशव पाटील या शेतकऱ्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांकडे कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीची तक्रार केली होती. त्याअनुषंगाने जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मंगरूळ येथे भेट देऊन शेताची परिस्थितीची पाहणी केली व याबाबत अहवाल देण्याचे कबूल केले.

शेतात बागायती राशी कंपनीच्या राशी ६५९ या जातीचे वाण ४ पिशव्या, राशी नियो या कंपनीच्या २ पिशव्या, महिको धनदेव या जातीचे २ पिशव्या व नाथ ११० या जातीच्या २ पिशव्या लागवड केली होती. पैकी नाथ ११० वगळता इतर राशी व महिको या कंपनीच्या जातीच्या वाहनांना अल्प प्रमाणात लागले. याशिवाय बोंड अळीचा  प्रादुर्भाव झाला. विविध कंपन्यांचे औषधी फवारणी करूनदेखील बोंडअळी आटोक्यात येईना. अखेर मोठे नुकसान झाल्याने आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार अधिकारी संभाजी ठाकूर, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडल कृषी अधिकारी प्रदीप निकम, कृषी सहाय्यक किरण पाटील, कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण जळगाव अरुण तायडे व तेलबिया संशोधन  केंद्र,  जळगावचे शास्त्रज्ञ तुषार पाटील, राशी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अमोल बोरसे, क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील पवार आदी उपस्थित होते.

यावेळी फाफोरे रस्त्यावरील मंगरूळ शिवारात ४१५, ४२५  गट नं मधील शेतात एका बाजूला नाथ ११० व दुसऱ्या बाजूला राशी बियाणे लागवड केली. त्यात नाथ ११० या जातीने चांगला माल निघत आहे तर राशीच्या वाणांनी उत्पादन घटले व बोंड अळी आटोक्यात आली नाही. यावेळी स्वतः  जिल्हा अधीक्षक संभाजी  ठाकूर यांनी पाहणी केली. झाडांची बोंडे लागून गळती झाली, शिवाय जे लागले ते बोंड उमलले नाही. ही परिस्थिती पाहिली व दोन दिवसांत तसा अहवाल देण्याचे कबूल केले.

यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील,  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत जगदाळे, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष अरुण देशमुख, तापी उपसासिंचन समितीचे अध्यक्ष दिनकर पाटील, जळगाव जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास पाटील, संदीप पाटील, वि.का. सोसायटी सचिव अमोल पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरagricultureशेतीcottonकापूस