शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कालबध्द पदोन्नती मिळालीच पाहिजे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:40 IST

मागणी : घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणले

जळगाव- सातवा वेतन लागू झालाच पाहिजे...क़ालबध्द पदोन्नती मिळालीच पाहिजे...रिक्त पदांवरील निर्बंध हटवा...विद्यार्थी संख्येनुसार विद्यापीठाला पदे मिळालीच पाहिजे...यासह विविध मागण्यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ श्क्षिकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून गुरूवारी दुपारी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठ परिसर दणाणून गेले होते.पंचवीस प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील चौदा अकृर्षी विद्यापीठांमध्ये ३ जूनपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनाने सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे संघटनेकडून गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ संघटनेचे अध्यक्ष राजू रतन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता १८ जून रोजी संघटनेकडून उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काण्यात येऊन निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर २५ जुन रोजी पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयावर मोर्चा काढण्यात येईल. दरम्यान, शासनाने मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठे २९ जुन रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप म्हणून बंद पुकारणार आहेत. त्यानंतरही सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक न केल्यास महासंघाच्या निर्देशावरून जुलै महिन्यात कोणत्याही क्षणापासून अकृषी विद्यापीठे बंद करण्यात येतील, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.या आहेत मागण्याराज्यातील चौदाही अकृषी विद्यापीठे व विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवया वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन संरचना लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाºयांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना सुरू ठेवणे, रिक्त पदे भरण्यास निर्बंध उठविणे, ३० टक्के पदे कपातीचा धोरण रद्द करणे, नवीन पदे भरण्यास परवानगी देणे, कर्मचाºयांच्या बहुतांशी पदांमधील वेतन त्रुटी व असमानता दुर न करणे व समान सेवा प्रवेश नियम लागू करणे, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांना अडचणीची ठरणारी जाचक अट रद्द करणे, वैद्यकीय खर्चाच्या परिपुर्तीच्या योजनेतील त्रुटी दुर करणे यासह विविध मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव