शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat effect : हत्या,आत्महत्या प्रकरणात तात्काळ कारवाई करा ; महिला आयोगाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:21 IST

बदलापूरातील प्रकरण

बदलापूर/ जळगाव : बदलापूर येथील आठ वर्षीय मुलीचा हत्या व तिच्या आईची हत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाची राज्य महिला आयोगाने स्वत:हून गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोगाने ठाणे पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. ह्यलोकमतह्ण मध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल घेऊन आयोगाने पोलीस अधीक्षकांकडे विचारणा केली आहे.फ्लॅटसह विविध कारणांसाठी सतत पैशाची मागणी तसेच घटस्फोट घ्यावा यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मीना अशोक पाटील या विवाहितेने आठ वर्षाच्या पोटच्या मुलीचा चाकूने गळा चिरुन स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे १० जून रोजी रात्री ११ वाजता घडली. दरम्यान, या घटनेला मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला पती व सासू जबाबदार असून त्यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी मीना हिच्या वडीलांनी मंगळवारी ठाणे, अंबरनाथ व बदलापूर येथे पोलीस अधिकाऱ्यांकडे उंबरठे झिजवले, मात्र पोलिसांनी टोलवाटोलवी करुन मीना पाटील यांच्या वडीलांचा जबाब लिहून घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे टाळले. हा जबाबच महत्वाचा असून त्याआधारावर पुढील कारवाई करु असे सांगून नातेवाईकांची बोळवण केली.तपासाधिकाºयांची भूमिकाच संशयास्पदया प्रकरणाचे तपासाधिकारी उपनिरीक्षक हर्षल कुळकर्णी यांनी ह्यलोकमतह्ण ने विचारणा केली असता हे प्रकरण माझ्याचकडे आहे. मुलीच्या वडीलांना सर्व सविस्तर समजावून सांगण्यात आले आहे, आपण त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी असे सांगितले तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी दिलेली आहे, मात्र आपण गुन्हा दाखल केला नाही या प्रश्नावर बोलणे मात्र त्यांनी टाळले. एकंदरीतच या प्रकरणात मीना पाटील हिचे पती अशोक पाटील पोलीस दलात असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न बदलापूर पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप वडील दिलीप पाटील यांनी केला आहे.काय म्हटले आहे महिला आयोगानेराज्य महिला आयोगाच्या समुपदेशक सुनीता गणगे यांनी ठाणे पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, लोकमत या वृत्तपत्रात पोलीस असलेल्या पतीच्या जाचास कंटाळून मीना पाटील यांनी मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याची बातमी गुरुवारी प्रकाशित झाली आहे. याबाबत मुलीच्या वडीलांनी बदलापूर पोलिसात तक्रार दिली, मात्र पोलिसांकडून योग्य पध्दतीची दखल घेतली जात नाही. सदर प्रकरण गंभीर असून आयोगाने स्वाधिकाराने दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तात्काळ योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोगास सादर करावा असे आदेश वजा पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव