ऑनलाइन लोकमतसातगाव डोंगरी (जळगाव), दि. 21 - सातगाव तांडा येथील जि.प.मराठी शाळेतील शिक्षक वेळेवर शाळेत येत नसल्याच्या निषेधार्थ २१ रोजी या शाळेस पदाधिकारी व ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने याबाबीच्या निषेधार्थ तसेच याकडे लक्ष वेधण्यासाठी उपसभापती अनिता पवार, ग्रामस्थ सोनूसिंग राठोड , राजेंद्र चव्हाण, भरत राठोड, देविदास चव्हाण, शालेय समिती चेअरमन गणेश चव्हाण आदींनी शाळेला कलूप ठोकले. शाळेत एकूण ३६ विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहे तर सध्या एक शिक्षक रजेवर असल्याचे सांगितले. दरम्यान बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
सातगाव तांडा शाळेला ठोकले कुलूप
By admin | Updated: March 21, 2017 19:53 IST