शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलीस निरीक्षकाला भोवली लॉकडाऊनमध्ये दारु विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:47 IST

लॉकडाऊन असतानाही नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स या गोदामाचे सील उघडून दारुची वाहतूक व विक्री केल्याचे प्रकरण पोलिसांना चांगलेच अंगलट आले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह दारु दुकान मालकाच्या संपर्कात असलेले पोलीस कर्मचारी आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे भारत शांताराम पाटील व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे यांनाही या गुन्ह्यात गुरुवारी आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणात आता आरोपींची संख्या १२ झाली आहे.

ठळक मुद्देनिरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह चार पोलिसांना केले आरोपीअवैध दारु प्रकरण आले अंगलट गुन्ह्यात कलम वाढविले, आरोपींची संख्या १२ वर

जळगाव : लॉकडाऊन असतानाही नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स या गोदामाचे सील उघडून दारुची वाहतूक व विक्री केल्याचे प्रकरण पोलिसांना चांगलेच अंगलट आले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह दारु दुकान मालकाच्या संपर्कात असलेले पोलीस कर्मचारी आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशिनाथ पाटील, जिल्हा पेठचे संजय जगन्नाथ जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे भारत शांताराम पाटील व मुख्यालयाचे मनोज केशव सुरवाडे यांनाही या गुन्ह्यात गुरुवारी आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणात आता आरोपींची संख्या १२ झाली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल रोजी सकाळी अजिंठा चौकात कारमधून (क्र.एम.एच.१८ डब्लु ९८४२) आर.के.वाईन्स येथे येत असलेला दारुचा साठा जप्त केला होता. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अमोल ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात नितीन शामराव महाजन (२९, रा.अजिंठा हौ.सोसायटी, जळगाव), नरेंद्र अशोक भावसार (३३,रा.अयोध्या नगर) व परवानाधारक दिशान यांचे पती दिनेश राजकुमार नोतवाणी (रा.आदर्श नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आर.के.वाईन्सचा व्यवस्थापक गणेश दिलीप कासार (३०, रा. शिवाजी नगर), परवानाधारक दिशा दिनेश नोतवाणी (रा.आदर्श नगर) यांना आरोपी करण्यात आले होते. चौकशीअंती आता पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह राजकुमार शितलदास नोतवाणी, सुधा राजकुमार नोतवाणी, पोलीस कर्मचारी जीवन पाटील, संजय जाधव, मनोज सुरवाडे, भारत पाटील यांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना आरोपी करण्यात आले. त्याशिवाय गुन्ह्यात महाराष्टÑ दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८१,७२,७५, महाराष्टÑ पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४५ (क) भादवि कलम ११४, ११६ प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहे. 

सर्व संशयितांना नोटीसादरम्यान, गुन्ह्यातील सर्वच संशयितांना कलम ४१ (१) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. सह इतर तीन पोलिसांचा समावेश करण्यात आला.  एमआयडीसीचे कर्मचारी दीपक चौधरी, रवींद्र चौधरी, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे भरत शांताराम पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत व रवी नरवाडे यांचाही जबाब घेण्यात आलेला असून या नेरकर, राजपूत व नरवाडे वगळता सर्वच पोलिसांचा चार वेळा जबाब घेण्यात आला. त्याशिवाय त्यांच्या आवाजाचाही पडताळणी केली आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्याकडे सोपविण्यात आला.

कोट..या प्रकरणात एसआयटीची चौकशी अजून सुरु असून तपास अंतिम टप्प्यात आहे. निष्कर्षापर्यंत कामकाज व पुरावे तयार झालेले आहेत. लवकरच कारवाईची माहिती जाहीर करु. याप्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव