शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ‘लाईनमन’ला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:46 IST

वर्दीतील माणुसकी! चक्कर येऊन कोसळताच पोलीस निरिक्षकांसह कर्मचारी धावले मदतीला

जळगाव- पोलीस दलाबाबात सर्वसामान्यांचे मत फारसे चांगले नसते़ पण काही पोलीस त्याला अपवाद असून त्यांच्यातही माणुसकीचा अंश शिल्लक असल्याचे पोलिसांनी रविवारी दाखवून दिले आहे़ ही खाकी वर्दीतली माणुसकी सध्या पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला आहे़ निंभोरा येथून आल्यानंतर ईच्छादेवी चौकात वाहनातून उतरताच एमईसीबीमधील असिस्टंट लाईनमन विजय एकनाथ टोकरे (रा़ निंभोरा) यांना अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले़ व त्यांच्या हाता-पायाला वात आले़ हा प्रकार दिसताच चौकात कर्तव्यावर असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक रणजित शिरसाठ व पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेत त्वरित एका वाहनातून खाजगी रूग्णालयात नेले़ वेळेवर प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे टोकरे यांना जीवनदान मिळाले आहे़ त्यामुळे एकदा पुन्हा खाकीतील माणुसकी जळगावकरांना बघायला मिळाली.विजय टोकरे हे निंभोरा येथील रहिवासी असून जळगाव शहरातील आदर्शनगर युनिटमध्ये असिस्टंट लाईनमन म्हणून कार्यरत आहेत़ नियमित ते निंभोरा ते जळगाव अप-डाऊन करतात़ नेहमीप्रमाणे विजय हे रविवारी सकाळी १० वाजता ईच्छादेवी चौकात चारचाकी वाहनातून उतरले़ परंतु, वाहनातून उतरताचं त्यांना चक्कर येण्यास सुरूवात झाली़ व ते बाजूच्या तरूणाचा हात पकडून खाली बसले व त्यांनी प्रकृती बिघडत असून त्वरित पोलिसांना बोलवा सांगितले.सलाम पोलीस ! क्षणाचा विलंब न करता घेतली धावअयोध्या निकाल व ईद-ए-मिलाद निमित्त एमआयडीसी पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ व क्युआरटी पथक हे ईच्छादेवी चौकात तैनात होते़ शिरसाठ यांना लाईनमन टोकरे हे वात आलेल्या अवस्थेत दिसून आले़ त्यांनी क्षणाचा विलंब न करता क्युआरटी पथकासह त्याठिकाणी धाव घेतली़ टोकरे यांना शरिरीला वात आल्यामुळे प्रकृती चिंताजनक झाली होती़ पोलीस निरिक्षक शिरसाठ यांनी त्वरित रस्त्यावरील वाहन थांबवून पोलिसांच्या मदतीने टोकरे यांना उचलून वाहनात बसविले व त्वरित खाजगी रूग्णालयात हलविले.प्रशिक्षणात मिळालेल्या उपचारपध्दतीचा वापरदरम्यान, चक्कर येऊन कोसळल्यानंतर लाईनमन विजय टोकरे यांची प्रकृती चिंताजनक झाली होती़ पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतल्यानंतर वाहन येण्याआधी पोलीस प्रशिक्षणात मिळालेल्या उपचार पध्दतीचा वापर करून आलेला टोकरे यांची प्रकृती बरी करण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला़ याचा थोडा फायदाही झाला व नंतर टोकरे यांना वाहनातून खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.प्रकृती ठणठणीत ; पोलिसांचे मानले आभारपोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे विजय टोकरे यांना एकप्रकारे जीवनदान मिळाले, असे म्हणता येईल़ अन्यथा उशीर झाला असता तर जीवावर बेतले असते़ तर टोकरे यांची प्रकृती आता ठणठणीत असून पोलिसांमुळे जीवनदान मिळाले असल्याचे म्हणत त्यांनी त्यांचे आभार मानले़ दरम्यान, यापूर्वीही त्यांना रक्तदाबचा त्रास झाला होता़ तर मुलीसोबतच काही दिवसांपूर्वीच असा प्रसंग घडला असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव