शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

दिव्याच्या अवयव दानाने सात रुग्णांच्या जीवनात प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:51 IST

दिव्या लुनावत यांची खंडित झालेली आयुष्याची दोर आज एक नव्हे तर सात जणांच्या जीवनात जगण्याची नवी उमेद दिली आहे.

 मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : आजोबांचे देहदान, मामींनी केले नेत्रदान आणि दुर्दैवाने घरात पडल्यामुळे ब्रेन डेड झालेल्या नातीचे डोळे, यकृत, मूत्रपिंड आणि त्वचा दान दिल्याने तब्बल सात रुग्णांना जीवन जगण्याची नवीन उमेद देणाऱ्या मुक्ताईनगर येथील जैन कुटुंबाची नात आणि जळगाव येथील डॉ.आचालिया यांची कन्या सिडको (नाशिक) येथील लुनावत कुटुंबाची सून दिव्या लुनावत यांची खंडित झालेली आयुष्याची दोरी आज एक नव्हे तर सात जणांच्या जीवनात जगण्याची नवी उमेद दिली आहे.अवयव दान हेच श्रेष्ठ दान होय. समाजातील चालीरीती व प्रवाहाविरुद्ध जाऊन प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण मरणोत्तर अवयव दानातून इतरांच्या जीवनात जगण्याची संधी देण्याचा वसा घेतलेल्या मुक्ताईनगरचे माजी सरपंच चंपालाल चांदमल (रेदासनी) जैन यांच्या कुटुंबातील परंपरा नातीनेही पुढे नेली आहे. या कौतुकास्पद कार्यात दिव्या यांच्या शरीरातील अवयवातून जीवन दान लाभलेले सात रुग्ण आणि त्यांचे कुटुंबच नव्हे तर समाजमन ही अवयव दानाच्या आदर्श कार्याचे कौतुक करीत ऋण व्यक्त करीतआहे.घरात पडल्याने ब्रेन् हॅमरेज नाशिक सिडको परिसरातील रहिवासी अरिहंत ज्वेलर्सचे संचालक लालचंद लुनावत यांची सून व नीलेश लुनावत यांची पत्नी तसेच जळगाव शहरातील मानराजपार्क येथील रहिवाशी डॉ.प्रकाशचंद आचालिय यांची मुलगी, मुक्ताईनगर येथील कापड व्यापारी अजित चंपालाल जैन यांची भाची दिव्या नीलेश लुनावत (वय ४३) यांना ब्रेन हॅमरेज असल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्त्राव झाला व त्या अचानक कोमात गेल्या दिव्या लुनावत या घरातच पडल्याने मेंदूतून आणि रक्तस्त्राव होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मानवी अवयव दान कायदा १९९४ च्या शासकीय नियमावलीनुसार रुग्णाला ब्रेन स्टेन डेड कमिटीने मेंदू मृत घोषित केले. दिव्या यांंच्या आयुष्याची दोर खंडित झाली. त्यांच्या अवयव दानातून इतरांच्या जीवनात प्रकाश देण्याचा निर्णायक कार्यत्याचे कुटुंब लुनावत परिवार तसेच समाज बांधवांनी घेतला.सात रुग्णांच्या जीवनात प्रकाशयानंतर अशोक मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पुढाकाराने दिव्या यांचे अवयव दान करण्यात आले. मूत्रपिंड, यकृताचा एक भाग, दोन डोळे व कर्करोग झालेल्या तीन रूग्णांना त्वचा असे एकूण सात अवयव इतर रुग्णांना मिळाले. त्यामुळे त्या सात रुग्णांना जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे आणि दिव्याच्या अवयव दानामुळे त्यांच्या जीवनात प्रकाश मिळाला.अवयव दानाचा वसावैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी असलेल्या दिव्या यांच्या माहेरमध्ये वडील डॉक्टर, मामा डॉ.प्रसन्न रेदासनी, मामभाऊ डॉ.यशपाल जैन हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे त.    दिव्या ह्या मुक्ताईनगर येथील जैन (रेदासनी) कुटुंबियांची नात असून, त्यांचे आजोबा स्व.चंपालाल जैन यांनी सहा वर्षांपूर्वी देहदान केले व मामी स्व.निर्मलादेवी अजित जैन यांनी पाच वर्षांपूर्वी नेत्रदान असे मरणोपरांत अवयव दान केले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर