शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

भुसावळ विभागात बंद आंदोलनामुळे जनजीवन प्रभावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:42 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भुसावळ परिसरात आयोजीत करण्यात आलेल्या बंदमुळे जनजीवन प्रभावीत झाले होते. आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी मोर्चे, ठिय्या आंदोलन करून कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्दे बंदला शंभर टक्के प्रतिसाद, बहुसंख्य ठिकाणी शुकशुकाटकुठेही घडला नाही अनुचित प्रकारमहामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा

भुसावळ/ यावल/ रावेर/ मुक्ताईनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी ९ आॅगस्ट या क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पाठींबा देण्यासाठी तापी परिसरातील सकल मराठा समाजातर्फे ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करीत कडकडीत बंद पाळण्यात आला.भुसावळात बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. शहरात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे नाहाटा महाविद्यालयाच्या चौफुलीपासून सकाळी ११ वाजता मोर्र्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातील मुख्य मार्ग असलेल्या जामनेर रोड, अष्टभुजा देवी मंदिर, भारत मेडीकल, मरिमाता मंदिर, मोठी मस्जिद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्टॅण्ड, लोखंडी पुल, गांधी पुतळा मार्गे प्रांत कार्यालय येथे दुपारी १२ वाजता पोहचला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चातील विद्यार्थीनींनी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन दिले. यावेळी मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान करणाºया समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रांताधिकारी चिंचकर यांना निवेदन देतेवेळी मनिषा देशमुख, अश्विनी पाटील, स्वरदा ओगले, प्रतिक्षा पवार, मनोरमा ओगले, अलका भगत, सायली पवार, मनिषा पवार, डिंपल पवार आदी उपस्थित होते. मोर्चात आमदार संजय सावकारे, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष रवींद्र लेकुरवाळे, जि. प. सदस्य रवींद्र पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे नगरसेवक मुकेश गुंजाळ, अ‍ॅड . तुषार पाटील, कृष्णा शिंदे, कुºहे पानाचे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, जितेंद्र नागपूरे, आदी उपस्थित होते.यावलला ठिय्या आंदोलनयावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी येथील भुसावळ टी पॉइंर्टवर दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हरीभाऊ जावळे यांचे भाषण आंदोलकांनी उधळून लावले. त्यांच्या भाषणादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्याने जावळेंना भाषण आटोपते घ्यावे लागले. आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, प्रा. मुकेश येवले, देवकांत पाटील, मराठा सेवा संघाचे अजय पाटील, किनगावचे विजय पाटील यांनी केले.मुक्ताईनगर येथे रास्ता रोकोमुक्ताईनगर येथे महामार्गावर वर मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन मोठ्या प्रमाणात निदर्शने देखील करण्यात आली. या प्रसंगी मराठा समाजातील युवकांनी टाळ-मृदंगाच्या तालावर भजन करत शासनाचा निषेध केला आणि समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे ईश्वर राहणे , यु.डी. पाटील, विनोद सोनवणे, दिनेश कदम, संतोष मराठे, आनंदराव देशमुख, शेषराव पाटील, विनोद तोरे, सुभाष पाटील, त्रिशूल मराठे, डॉ जगदीश पाटील, सुभाष बनिये, दीपक साळुंखे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील पुरनाड फाट्यावरही मराठा समाजातर्फे मोठे आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :agitationआंदोलन