जळगाव शहरात महापालिकेचे महाबळ, शिवाजीनगर व गोलाणी मार्केट असे तीन ठिकाणी केंद्र आहेत. ही सर्व केंद्र मिळून सध्या ५२ कर्मचारी अग्नीशमन विभागात कार्यरत आहेत. या विभागात अपूर्ण मनुष्यबळ असल्याने प्रत्येक केंद्रावर कर्मचाऱ्यांची विभागणी करून ड्युटीच्या वेळा लावण्यात येत आहेत. तसेच या ५२ कर्मचाऱ्यांमध्ये फक्त ६ कर्मचाऱ्यांनी फायर सेफ्टीचे शिक्षण घेतलेले आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांनी फायर सेफ्टीबाबत कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेतले नाही. अंतर्गत बदली होऊन, ते या विभागात दाखल झाले आहेत. तसेच या विभागाकडे ३५ फुटांपर्यंतच्या इमारतीपर्यंतच आग विझवण्याची यंत्रणा असून, आग विझविण्यासाठीदेखील फक्त तीन बंब आहेत.
शहरातील अग्निशमन केंद्र : ३
अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या : ५२
इन्फो :
अत्याधुनिक साहित्यांचा अभाव :
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनपाकडे फक्त तीनच बंब आहेत. अत्यानुधिक सर्व सुविधांनी सज्ज असलेली एकही बंब मनपाकडे नाही. त्यामुळे एखाद्या ५० फुटांपर्यतच्या इमारतील आग लागल्यावर अशा ठिकाणी आग विझविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तसेच शिडीदेखील नाही. विशेष म्हणजे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्याही अपूर्णच आहे.
इन्फो :
अग्निशमक विभागात सध्या कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण आहे. वाहनेदेखील अपूर्ण आहेत. मात्र, लवकरच चार वाहने नवीन येणार आहेत. कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव दिला आहे.
शशिकांत बारी, विभागप्रमुख, अग्निशमक विभाग, मनपा.