समन्वय समिती गठीत करण्याबाबत विभाग नियंत्रकांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:52+5:302021-04-28T04:16:52+5:30

एसटी महामंडळ : समितीत कामगार अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एसटी महामंडळातील कोरोना बाधित होणाऱ्या ...

Letter to the Divisional Controller regarding formation of Coordinating Committee | समन्वय समिती गठीत करण्याबाबत विभाग नियंत्रकांना पत्र

समन्वय समिती गठीत करण्याबाबत विभाग नियंत्रकांना पत्र

Next

एसटी महामंडळ : समितीत कामगार अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एसटी महामंडळातील कोरोना बाधित होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत, रुग्णालयात बेड, ऑक्सिजन व इतर सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी महामंडळ प्रशासनाने जळगाव विभागाचे विभाग नियंत्रकाना पत्र पाठवून, समन्वय समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. या समन्वय समितीत कामगार अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असून लवकरच ही समिती गठीत करण्यात येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सरकारी आस्थापना व महामंडळामध्ये समन्वय समिती गठीत करण्याचे संबंधित विभागांना आदेश दिले होते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळातर्फे महामंडळाच्या जळगाव विभागाला मंगळवारी पत्र पाठवून समन्वय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीद्वारे कोरोना संक्रमित अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बेडची व्यवस्था करून देणे, एखाद्या कर्मचाऱ्याला ऑक्सिजनची गरज भासल्यास ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यकतेनुसार सरकारी किंवा खाजगी संस्थेकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णालयात तब्येतीनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उपचाराबाबत सर्व कर्मचाऱ्यांना स्वतःचे दूरध्वनी देणे, आदी सूचना महामंडळातर्फे या पत्राद्वारे कळविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जळगाव विभागात समन्वय समिती स्थापन होणार असल्यामुळे चालक-वाहकांच्या समस्या मिटणार असून, कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना योग्य त्या ठिकाणी उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

इन्फो:

जळगाव विभागात समन्वय समिती स्थापन करण्याबाबत महामंडळाचे पत्र प्राप्त झाले आहे. लवकरच समन्वय समिती स्थापना करण्यात येणार आहे. कोरोना बाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जी काही मदत लागेल, त्याची व्यवस्था करण्यासाठी ही समिती कटिबद्ध राहील.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी

इन्फो :

या समन्वय समितीमुळे कोरोना बाधित चालक- वाहकांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे. पूर्वी कर्मचाऱ्याने कोरोनाबाबत काही लक्षणे सांगितली तरी कामावर बोलविण्यात येत होते. मात्र, आता या समन्वय समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाईल, असे वाटते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

-नरेंद्र सिंग राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना.

Web Title: Letter to the Divisional Controller regarding formation of Coordinating Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.