शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

एलईडी लावूनही ‘दिव्या खाली अंधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:22 IST

अनेक ठिकाणी अधून-मधून बंद असतात दिवे

जळगाव : शहरात ईईएसएलच्या माध्यमातून १५ हजार एलईडी बसविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत ७ हजार एलईडी शहरात लावण्यात आले आहेत. मात्र, ज्या भागामध्ये एलईडी बसविण्यात आले आहेत, अशा भागात ठराविक एलईडी सुरु आहेत तर अनेक ठिकाणी एका एलईडीचे अंतर जास्त असल्याने एलईडीचा प्रकाश पोहचत नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले.शहरात अनेक भागांमध्ये एलईडी बसविण्याचे काम सुरु आहे. मात्र, काही दिवसांमध्येच नागरिकांकडून एलईडीबाबत तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ ने शहरातील काही भागांमध्ये पाहणी केली असता, अनेक भागांमध्ये लावण्यात आलेले एलईडी हे शो पुरतेच ठरत असून, प्रकाश देखील जास्त मिळत नसल्याचेही या सर्वेक्षणात आढळून आले.मू. जे.महाविद्यालय भागात १४ एलईडी बंदप्रभात चौक, मू.जे.महाविद्यालय ते गिरणा टाकी परिसरात १४ एलईडी बंद असल्याचे आढळून आले. काही एलईडी कधी बंद तर कधी सुरु असल्याच्या या भागात तक्रारी आहेत. यासह अजिंठा चौफुली परिसरात एलईडी सुरु होते. कहर म्हणजे काही एलईडी हे दिवसा देखील सुरु असल्याचे सर्वेक्षणात आढळले.पिंप्राळा, गणेश कॉलनी परिसरपिंप्राळा भागात आठवडाभरापूर्वी एलईडी लावण्यात आले. मात्र, आठ दिवसातच या भागातील निम्मे एलईडी बंद झाल्याचे आढळून आले. पिंप्राळा भागातील महामार्गावरील पुलाच्या बाजुलाच दोन मोठे एलईडी लावण्यात आले होते. मात्र, हे एलईडी देखील बंद असल्याचे आढळून आले. दरम्यान, कोर्ट चौक ते गणेश कॉलनी चौकापर्यंतच्या रस्त्यावर देखील निम्मे एलईडी सुरु तर निम्मे एलईडी बंद असल्याचे आढळून आले.नगरसेवकाला माहिती देण्यास विद्यूत विभाग प्रमुखांचा नकारशहरात एलईडी बसविण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत पिंप्राळा भागातील भाजपाचे नगरसेवक मयूर कापसे यांनी मनपा विद्यूत विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील यांना विचारणा केली असता, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे उत्तर दिल्याची माहिती नगरसेवक कापसे यांनी ‘लोकमत’ ला दिली.स्टेशन रोड परिसरात पथदिवे बंदअत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या नेहरु चौकापासून ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे बंद दिसून आले. तसेच टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदकडे जाणाºया रस्त्यावरही काही ठिकाणी पथदिवे बंद होते. पद्मालय विश्रामगृहासमोरच चौकामध्ये महावितरणचा विद्युत खांब असून या त्यावर दोन पथदिवे बसविण्यात आले आहेत. यातील एक दिवा अधून-मधून कधी तरी सुरु असतो. तर याच ठिकाणी नेहरु चौकाकडे जाणाºया रस्त्यावरील पोलवर दोन दिव्यांपैकी एकच दिवा सुुरु असलेला दिसून आला.यामुळे रात्रीच्या वेळेला या चौकातच अंधार राहत असल्यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने या वर्दळीच्या परिसरामध्ये सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी आहे.चाचणी न करताच लावले जाताहेत एलईडीईईएसएलच्या माध्यामातून शहरात हे एलईडी बसविले जात असून कंपनीतून आलेले एलईडी बसविले जात आहेत. कंपनीकडून कोणतीही चाचणी न करताच हे एलईडी बसविले जात असल्याची धक्कादायक माहिती मनपा विद्यूत विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील यांनी दिली.अनेक भागात बसविले कमी दाबाचे दिवेशहरातील मुख्य बाजारपेठ भागासह इतर भागांमध्ये ७० होल्ट क्षमतेच्या दिव्यांची गरज असून मनपा प्रशासनाकडून केवळ २४ होल्टचे दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे एलईडी बसविल्यावर देखील पुरेसा उजेड मिळत नसल्याची तक्रार नागरिकांसह अनेक नगरसेवकांकडून होत आहे. शहरात एकूण २८ हजार खांब असून त्यापैकी ४० टक्के खांब हे निकामी आहेत. त्या खांबांवर हे दिवे लावले जात नसल्याने दोन एलईडीमधील अंतर हे वाढत जात आहे. यामुळे ते लावूनही पुरेसा उजेड पसरत नसल्याचे आढळून आले.स्वातंत्र्य चौक ते नेहरु चौकपर्यंत अंधारच अंधारस्वातंत्र्य चौक ते नेहरू चौकपर्यंत लावण्यात आलेल्या ४४ एलईडीपैकी जेमतेम १४ ते १५ एलईडी सुरु असल्याचे आढळून आले. बसस्थानक ते क्रीडा संकूलपर्यंतच्या रस्त्यावर तर एकही एलईडी सुुरु नसल्याने अंधार पहायला मिळाला. नेहरु चौक ते टॉवर चौक पर्यंतदेखील चार ते पाच एलईडी बंद होते. रेल्वे स्टेशनकडील रस्त्यालगतदेखील हिच स्थिती पहायला मिळाली.काही भागांमध्ये कमी होल्टचे एलईडी दिवे लावण्यात आलेले होते. त्यात देखील काही बरेच खराब निघाल्यामुळे ते कंपनीला बदलविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याबाबत नगरपालिका संचालकांकडेदेखील विषय मांडण्यात आला आहे. लवकरच खराब एलईडी बदलविण्यात येतील.- एस.एस.पाटील, मनपा विद्यूत विभाग प्रमुख

टॅग्स :Jalgaonजळगाव