भडगाव, जि.जळगाव : गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पाणीटंचाई बिकट आहे. शासनाला नारपार योजनेचे कामे सुरू करण्याबाबत अनेकदा निवेदनेही दिलेली आहेत. तरी मागणी करुनही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गिरणा धरणाचे पाणी सन १९७६ ते १९७७ याकाळात बारमाही चालणारे धरण एकही रोटेशन चालवू शकत नाही. शासनाने मागचे रेकॉर्ड पाहून काम केले पाहिजे. प्रश्न सोडविले पाहिजे. नारपार योजनेच्या कामांची वेळोवेळी मागणीही केलेली आहे. एकीकडे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्र्यांना सिंचनासाठी निधी वाढवा असे म्हणाले होते. तरी अजूनही काही कामे सुरू झाली नाहीत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन २८ जानेवारी रोजी नदीजोड प्रकल्प हाती घेणार असल्याचे म्हणाले होते. परंतु अजूनही नारपारचे काम सुरू झाले नाही. शासनामार्फत घोषणा होऊनही दुर्लक्षच होत आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, तालुका उपाध्यक्ष विलास देशमुख, विजय पाटील, शहराध्यक्ष भगवान चौधरी, गोविंद नरवाडे, अरुण पाटील, जगन्नाथ मोरे, यादव मराठे, हरी राठोड आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, घुसर्डी खुर्दचे पोपट पाटील, भीमराव पाटील, विजय पाटील लोणपिराचे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
गिरणा धरणातून जामदा कालव्यासाठी आवर्तन सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 20:53 IST
गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.
गिरणा धरणातून जामदा कालव्यासाठी आवर्तन सोडा
ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणीतहसीलदारांना दिले निवेदन