शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

भुसावळात ‘नवोदय’ला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:47 IST

साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे.

ठळक मुद्देलाखो लीटर पाण्याची नासाडीडबके साचल्याने आरोग्याला धोकाप्रशासनाचे दुर्लक्ष

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव महामार्गावर जवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली असून, दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असून, साचलेल्या डबकीत डासांचा प्रादुर्भाव होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.जल है तो कल है, पाणी जपून वापरा, पाणी आडवा पाणी जिरवा, पाण्याचा वापर काटकसरीने करण्यासाठी शासन पाणी वाचवण्यासाठी कोट्यवधी खर्च करत असते मात्र यात शासनाच्या नियमांना शासकीय अधिकाऱ्यांमार्फत खो दिलेला दिसून येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आधीही काम करत असताना या जलवाहिनीला गळती लागली होती. भर उन्हाळ्यामध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी होत होती. महामार्ग प्राधिकरणाने मक्तेदारामार्फत लगेच जलवाहिनी दुरुस्ती करून घेतली होती व त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. यानंतर हे कार्य आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळांतर्गत येत आहे. याविषयी संबंधित जलशुद्धीकरण केंद्र साकेगावचे उप अभियंता पी.पी. पाटील यांना वारंवार सूचना करून व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही.लाखो लीटर पाण्याची नासाडीजवाहर नवोदय विद्यालयात पाणीपुरवठा करण्यात जलवाहिनीला याठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आला आहे. नेमके यास गळती लागली असून २४ तास पाणीपुरवठा सुरू असतो व यातून दररोज लाखो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असते.साचलेल्या डबक्यामुळे आरोग्य धोक्यातगळतीमुळे मोठे डबके तयार झाले आहे. हेच पाणी रस्त्यावर येते. यामुळे नागरिकांना ये-जा करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. साचलेल्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होत आहे. यामुळे साथीच्या आजाराच्यां रुग्ण संख्येने वाढ होत आहे.लहान मुले व गुरे फसतात डबक्यातसाचलेल्या पाण्यामुळे मोठे डबके तयार झाले आहे. या ठिकाणी लहान मुलांना तसेच गुराढोरांना अंदाज येत नाही. यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लहान मुलं व गुर अडकले असल्याचेही निदर्शनास आले आहे.त्वरित दुरुस्ती करावीसाकेगावजवळील महामार्गावर वाय पॉईंट जवळ येता-जाता लाखो लोकांच्या निदर्शनास येणाºया पाण्याचा अपव्यय पाहून भुसावळ शहरामध्ये आठ दहा दिवसात पाणी पिण्यास मिळत नाही. मात्र याठिकाणी पाणी मुबलक असतानासुद्धा फक्त तांत्रिक कारण सांगून लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण फिरणाºया नागरिकांना मात्र हे दृश्य बघून अंगावर शहारे येतात. त्वरित पाण्याची गळती दुरुस्त करावी व पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा जनसामान्यात व्यक्त करण्यात येत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातBhusawalभुसावळ