शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एलसीबीची ‘बीट’ संकल्पना मोडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:02 IST

पोलीस अधीक्षकांचे आदेश

ठळक मुद्देप्रत्येक कर्मचाऱ्याची हद्द आता संपूर्ण जिल्हा राहणार

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीची बीट संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सोमवारपासून मोडीत काढली. त्यामुळे आता एलसीबीचा प्रत्येक कर्मचारी जिल्ह्यात कुठेही जावून कारवाई करु शकणार आहे. दरम्यान, बीट संकल्पना मोडित काढल्यामुळे कर्मचाºयांची मात्र गोची झाली आहे.गेल्या कित्येक वर्षापासून स्थानिक गुन्हे शाखेत बीट संकल्पना होती. प्रत्येक तालुक्याचे एक या प्रमाणे पंधरा तालुक्यांचे पंधरा व जळगाव शहर १ असे १६ बीट स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात कार्यरत होते. त्या बीटसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्तीला होते. त्या कर्मचाºयांवर आपआपल्या बीटमधील अवैध धंदे, गुन्हे यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती. चोरी, घरफोडी, खून, जबरी चोरी, दरोडा, सोनसाखळी लांबविणे, बॅग लांबविणे अपहरण यासारखे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा अशा दोन यंत्रणा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणत होते.गुन्हे उघडकीस आले नाहीत तर त्याला संबंधित बीटचे कर्मचारी जबाबदार धरले जायचे. आता एखाद्या गुन्ह्याचा तपास करावयाचा असेल तर पोलीस निरीक्षक आपल्या अधिकारात अधिकारी व कर्मचाºयाची नियुक्ती करतील. त्यांनी गुन्हा उघडकीस आणला तर त्याचे श्रेय त्याला, प्रलंबित राहिला तरही त्याची जबाबदारी त्या कर्मचाºयावर राहणार आहे.अनेक प्रकरणांना बसणार चापबीट संकल्पनेमुळे सबंधित कर्मचाºयाचे आपआपल्या बीटमध्ये खबरे व स्वतंत्र अशी यंत्रणा तयार झाली होती. त्याशिवाय आर्थिक व्यवहारही ठरलेले होते. आता या सर्वच बाबींना चपराक बसणार आहे. त्याशिवाय अवैध धंदे चालकांवरही कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.दरम्यान, बीट संकल्पना मोडीत निघाल्याने कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.जी. रोहोम यांनी सोमवारी सकाळी बीट कर्मचाºयांची बैठक घेऊन बीट संकल्पना यापुढे राहणार नसल्याची जाणीव करुन दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे कार्यक्षेत्र जिल्हा आहे, त्यामुळे कोणताही कर्मचारी जिल्ह्यात काम करेल अशा सूचना त्यांनी दिल्या. या वृत्तास रोहोम यांनीही दुजोरा दिला.बीट हा विषय कायद्यातच नाही. त्यामुळे हा विषय यापुढे राहणार नाही. प्रत्येक कर्मचाºयाने त्याला मिळालेल्या माहितीच्या आधारावर जिल्ह्यात काम करावे. कोणाला काय काम द्यायचे याची जबाबदारी निरीक्षकाची आहे. त्यांनी कर्मचाºयांकडून चांगले काम करुन घ्यावे व अवैध धंद्यावर नियंत्रण ठेवावे हीच अपेक्षा आहे.-दत्तात्रय शिंदे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव