आॅनलाईन लोकमतपारोळा,दि.२१ : किसान महाविद्यालयासमोरील शिवाजी नगर येथील कुटुंब बारडोली (गुजरात) येथे लग्नाला गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील लाखो रुपयांची रक्कम चोरून नेली आहे.पारोळा शहरातील धनश्री मेडिकल व ड्रेसेसचे मालक जगदीश शिवाजी आफ्रे हे पत्नी अॅड.कृतिका आफ्रे यांच्यासहे किसान महाविद्यालयासमोरील शिवाजी नगर येथे रहातात. १९ रोजी बारडोली सुरत येथे नातेवाईकांकडे लग्न कार्य असल्याने ते गेले होते. २१ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास शहरातील सोमनाथ टोळकर हे अॅड.कृतिका आफ्रे यांना न्यायालयाच्या कामासाठी त्यांच्या घरी भेटायला गेले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा व कडी कोयंडा तोडलेला दिसला. चोरटयांनी कपाटे,लॉकर, बॅगा, सुटकेस मधील सामान अस्ताव्यस्त केले. याप्रकरणी चेतन भरत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.
पारोळ्यात बंद घरातून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 18:58 IST
घरमालक लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधली चोरट्यांनी
पारोळ्यात बंद घरातून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास
ठळक मुद्देघरी कुणी नसल्याची संधी साधत केली घरफोडीघर उघडे दिसल्याने घरफोडीची घटना झाली उघडपारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल