शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पाईप लाईन गळतीमुळे जळगाव शहरात उशिराने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:54 IST

वाघूर पंपींग वरील पंप बंद व मेहरूणमधील पाईप लाईनची गळती यामुळे शहरात बºयाच भागात शनिवारी पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने झाला. यामुळे नागरिकांचे हाल झाले.

ठळक मुद्देसिंधी कॉलनी व परिसरातील उपनगरे, समता नगर, जुनेगावाचा काही भागात, नित्यानंद नगरकडील काही भाग, महाबळ परिसरातील पूर्वेकडील कॉलन्यांचा भागात उशिराने पाणी पुरवठासुप्रीम कॉलनीतील अर्ध्या भागात उशिराने व तर अर्ध्या भागात पाणी पुरवठा नाहीमेहरूण भागात मुख्य रस्त्यावरील पाईप लाईनला गळती

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१७ : वाघूर पंपींग वरील पंप बंद व मेहरूणमधील पाईप लाईनची गळती यामुळे शहरात बºयाच भागात शनिवारी पाणी पुरवठा उशिराने व कमी दाबाने झाला. यामुळे नागरिकांचे हाल झाले. रविवारी मात्र पाणी पुरवठा सुरळीत होईल असे सूत्रांनी सांगितले.वाघूर पपींगवर एका पंपात बिघाड झाली होती. त्याच्या दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत चारही पंप बंद होते. या ठिकाणी पंप दुरूस्तीची काम मनपा पाणी पुरवठा विभागाने युद्ध पातळीवर पूर्ण करून पंप सुरू केला.मेहरूणमध्ये गळतीमेहरूण भागात मुख्य रस्त्यावर भारूका किराणा दुकानाजवळ गेल्याच आठवड्यात गळतीची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र एक गळती त्यावेळी सापडली नव्हती. त्यामुळे या ठिकाणी पाणी गळती सुरूच होती. या गळतीवर सकाळपासून काम सुरू होते. तेदेखील पूर्ण करण्यात आले.पाणी पुरवठा विस्कळीतवाघुर पपींग वरील दुरूस्ती व मेहरूणमधील गळती थांबविणे या कामामुळे टाक्या भरण्यास उशिर झाला होता. त्यामुळे शहरातील सिंधी कॉलनी व परिसरातील उपनगरे, समता नगर, जुनेगावाचा काही भागात, नित्यानंद नगरकडील काही भाग, महाबळ परिसरातील पूर्वेकडील कॉलन्यांचा भागात उशिराने पाणी पुरवठा झाला. तर सुप्रीम कॉलनीतील अर्ध्या भागात उशिराने व तर अर्ध्या बागात पाणी पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू होती.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका