शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सट्टा अड्यावर रात्री धाड, २८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:03 IST

अपर पोलीस अधीक्षकांची कारवाई

ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांना खबर नाहीबिसमिल्ला चौक, महादेव मंदिर परिसरात धाड

जळगाव : अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार ठिकाणी सुरु असलेल्या सट्टा अड्डयावर धाड टाकली. त्यातील एक अड्डा एका नवनिर्वाचित नगरसेवकाचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सट्टा घेणारे व खेळणारे अशा एकूण २८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४२ हजार ४९८ रुपये रोख, १० मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ९२ हजार ९९७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.बिसमिल्ला चौक, महादेव मंदिर परिसरात धाडअपर पोलीस अधीक्षक मतानी यांनी गुरुवारी रात्री २० ते २५ जणांच्या शीघ्र कृती दलाच्या राखीव जवानांच्या ताफ्यासह महामार्गाला लागून असलेल्या शेरा चौकात धडकले. तेथून तांबापुरातील बिसमिल्ला चौक, महादेव मंदिर अशा ठिकाणी पोलिसांचे पथक पोहचले. पोलिसांचा ताफा पाहून सर्वत्र पळापळ झाली. मात्र २८ जणांना पकडण्यात पथकाला यश आले. अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने स्वत: जावून केलेली पहिलीच कारवाई आहे. काही वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी कारवाई केली होती.अटक करण्यात आलेल्यांमध्ये हेमंत जगन्नाथ नाथ, विकास रमेश सोनवणे, रफिक गनी तांबोळी, फिरोज शेख सलीम, शेख रशीद शेख रहेमद मिस्तरी, किशोर बळीराम सपकाळे, शेख मोईम हुसेन शेख, सलीम शेख रशीद शेख, गणेश कैलास शिवदे, रामलाल दामू शिंदे, राजेश साहेबराव सुतार, सिकंदर गफ्फार पटेल, नामदेव त्र्यंबक चव्हाण, आसान शेख जहांगीर व कदीर शेख कबीर यांच्यासह २८ जणांचा समावेश आहे.अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, सहायक निरीक्षक जी. पी. गांगुर्डे, सुनील दामोदरे, दीपक शिंदे, प्रशांत साळी, रफीक शेख कालू यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईमुळे अवैध धंदे चालक व धंद्यांना प्रोत्साहन देणाºया पोलिसांचे धाबे दणाणले आहेएमआयडीसी पोलिसांना खबर नाहीही कारवाई करताना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या एकाही अधिकारी अथवा कर्मचाºयाला सोबत घेण्यात आले नव्हते. त्यांना या कारवाईची खबरच मिळाली नाही. मतानी आरोपींची जत्रा घेऊन थेट पोलीस स्टेशनलाच दाखल झाले. पोलीस निरीक्षकासह सर्वच कर्मचारी अवाक् झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव