शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

जळगावात शीतपेटीच्या सुविधेने सुकर झाला ‘अंतिम प्रवास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:32 IST

जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनतर्फे अनोखी सेवा

ठळक मुद्देसामाजिक दायित्व३२ शीतपेटींद्वारे जिल्हाभरात सेवा

विजयकुमार सैतवालजळगाव : जीवनातील चढ-उताराचा संघर्षमय प्रवास करून मृत्यूनंतर अंतिम प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या देहाची शीतपेटीच्या सुविधेमुळे अवहेलना थांबून अंंतिम प्रवासही सुकर झाल्याचे दिलासादायक चित्र जळगाव जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या या अनोख्या मोफत सेवेचा दर महिन्याला साधारण पाचशेच्यावर कुटुंबीयांना लाभ मिळत आहे.गोर-गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येऊन विविध प्रसंगामुळे जीवन संघर्षमय असल्याचेच प्रत्येक जण सांगतो. जीवनातील या संघर्षानंतर मृत्यूपश्चात प्रत्येकाच्या देहाची अवहेलना न होता शेवटचा हा प्रवास तरी सुखकर व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येकाच्या कुटुंबीयांची असते. मात्र बºयाचवेळी मृत्यूनंतर मृतदेह काही दिवस ठेवायची वेळ आली तर मृतदेह चांगला राहून त्याची अवहेलनाही होऊ नये म्हणून जळगाव डिस्ट्रीक्ट मेडिसीन डिलर असोसिएशनने पुढाकार घेतला असून गेल्या पाच वर्षांपासून संघटनेमार्फत अनोखी सेवा देत मृतदेह ठेवण्यासाठी मोफत शीतपेटी उपलब्ध करून दिली जात आहे.असा आकाराला आला उपक्रमजिल्ह्यातील एका औषध विक्रेत्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी संघटनेचे पदाधिकारी पोहचले. त्या ठिकाणी हा मृतदेह बर्फावर ठेवलेला होता व बर्फाचे पाणी होऊन ते सर्वत्र पसरले होते आणि घरातील सदस्य ओले झाले होते. त्यावेळी हा प्रसंग पाहून अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटीची सोय उपलब्ध करून देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी संघटनेतील पदाधिकाºयांना ही गोष्ट बोलून दाखविली व सर्व जण तयार झाले.३२ शीतपेटींद्वारे जिल्हाभरात सेवा२०१३मध्ये या उपक्रमास सुरुवात केली त्या वेळी जिल्ह्यात इतर संस्थांच्या केवळ तीनच शीतपेट्या होत्या. त्याचा तपास काढला असता एका पेटीची किंमत सव्वा लाख रुपये होती. मात्र तरीही संघटना मागे फिरली नाही. त्यांनी जळगावातील राजेंद्र पाटील या तरुणाकडून प्रायोगिक तत्वावर ३५ हजार रुपयांना एक शीतपेटी तयार करून घेतली. ती व्यवस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर संघटनेने आणखी ३१ शीतपेटी तयार करून घेतल्या. त्यात राजेंद्र पाटील यांनीही ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सामाजिक बांधीलकी जपत या कामात आपलाही वाटा असावा म्हणून ३५ ते ४० हजारात एक शीतपेटी तयार करून दिली. त्यानुसार जळगाव शहरात सात व ग्रामीण भागात २५ अशा एकूण ३२ शीतपेटींद्वारे संघटना मोफत शीतपेटीची सुविधा देत आहे.दररोज कमी पडतात शीतपेटीजळगाव शहरात असलेल्या सात शीतपेटींना दररोज वेगवेगळ््या ठिकाणी मागणी असते. कधी-कधी तर एका ठिकाणाहून परत आणल्यानंतर पुन्हा लगेच दुसºया ठिकाणी ती शीतपेटी जाऊन एकेका शीतपेटीचा दिवसातून दोन वेळा उपयोग केला जातो. त्यामुळे महिनाकाठी साधारण पाचशेच्यावर कुटुंबीयांना या शीतपेटींचा लाभ होत आहे.असा घ्या लाभजळगाव शहरात केमिस्ट भवन येथे या शीतपेटी ठेवलेल्या असून तेथे संपर्क साधल्यास मागेल त्याला ती उपलब्ध करून दिली जाते. गरज पडल्यास कोणीही येऊन या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी केले आहे.सेवेसाठी यांचे सहकार्यया सेवेसाठी सुनील भंगाळे यांच्यासह अनिल झवर, श्याम वाणी, ब्रिजेश जैन, दिनेश मालू, जगदीश पलोड, अमित चांदीवाल, संजय तिवारी, धनंजय तळेले, विलास नेहेते, सुरेश कुकरेजा, मोहन भागवानी, इरफान सालार, लखीचंद जैन आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव