ठळक मुद्देपोलिसांनी वाहन जप्त केलेनगरसेवक नितीन बरडे यांनी कळविले पोलिसांना
जळगाव : महापालिकेसाठी मतदान सुरू असताना शहरातील समतानगर भागात एका वाहनात मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे.मतदानाला सुरुवात झाल्यानंतर समतानगर भागात स्टेट बँक कॉलनी येथे भुसावळ नगर परिषदेच्या सा.बां. विभाग सभापती असा फलक असलेली एम.एच. १९, बीडी ४१४१ ही कार उभी असल्याने त्या बाबत संशय आल्याने नगरसेवक नितीन बरडे यांनी या बाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता त्यात मोठी रक्कम असल्याचे समजले. पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे. भुसावळ येथील भाजपाचे आमदार संजय सावकारे यांचे भाऊ प्रमोद सावकारे यांच्या मालकीचे वाहन असल्याची माहिती समोर येत आहे.