नवीनच झालेल्या रस्त्यावर जर आत्ताच पाणी साचून राहिले तर लागलीच खड्डे पडण्याची शक्यता आहे आणि ते खड्डे वाहनचालकास धोकादायक ठरू शकतात.
हरताळे फाट्यावर उड्डाणपूल झाल्याने सर्वांसाठी सोयीचे झाले मात्र त्याखाली पहिल्याच पावसात पाणी साचले असल्याने उताराच्या दिशेने पाणी जाणे अपेक्षित आहे. पुलाखाली पाणी उताराच्या दिशेने काढून येणारा जाणाऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या चौपदरीकरणाचे काम चालू असताना तत्काळ या पुलाखालील साचलेल्या पाण्याची ताबडतोब विल्हेवाट व डांबरीकरण करून खड्डा राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा दुर्लक्ष झाल्यामुळे वाहनचालकांना येथील पुलाच्या खाली साचलेल्या पाण्याचा येणाऱ्या-जाणाऱ्या त्रासदायक ठरेल. त्यासाठी तत्काळ येथे गैरसोय दूर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.