शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लाडक्या गणरायाचे उद्या आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:03 IST

खरेदीसाठी लगबग : कोरोनाच्या सावटातही गणेश भक्तांमध्ये चैतन्य

जळगाव : यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. मांगल्याचे प्रतिक असलेला सर्वांचा गणपती बाप्पा देखील त्यातून सुटला नाही. गणेशोत्सव साध्या पद्धतीने केला जाणार असला तरी त्याची पूर्वतयारी मात्र यंदाही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. शनिवारी गणरायाची स्थापना होणार आहे. शहरातील मुख्य बाजार पेठेत गर्दी होऊ नये म्हणून दुकाने लावली गेलेली नाहीत. मात्र शहरातील गणेश कॉलनी, सागर पार्क, शिवतीर्थ मैदान या ठिकाणी दुकाने लावण्यात आली आहेत. त्याठिकाणी गणेश भक्तांची खरेदीसाठी लगबग कायम आहे.सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या एका दिवसावर आले असून बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत जोरदार खरेदी केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी दुकाने थाटण्यात आली असून खरेदीसाठी गणेशभक्तांची या दुकानांकडे वळत आहे.बाजारपेठ सजलीबाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठ सजली असून मूर्ती व इतर साहित्यांच्या विक्रीसाठी गणेश कॉलनी, शिवतीर्थ मैदान, सागर पार्क, अजिंठा चौफुली या परिसरात शेकडो स्टॉल थाटण्यात आले असून ग्राहकांकडूनही जोरदार खरेदी केली जात आहे.मंडळांची तयारीयंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात होत आहे. गणपतीच्या दहा दिवसातील उत्साहावर कोरोनाची काळी छाया असली तरी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. गर्दी टाळून साध्या पद्धतीने हा सोहळा होणार आहे.शहरातील प्रमुख मंडळांनी छोटे मंडप, मिरवणुका न काढण्याचे ठरवले आहे. तसेच आरती करताना किंवा पुजा करताना देखील शारीरिक अंतर आणि प्रशासनाचे नियम पाळण्यात येणार असल्याचे मंडळांच्यावतीने सांगण्यात आले. अनेक मंडळांचे मंडप तयार झाले असून पदाधिकारी, कार्यकर्ते रात्रंदिवस काम करताना दिसत आहे.अजिंठा चौफु लीवर विक्रेत्यांनी थाटली दुकानेराष्टÑीय महामार्गावरील अजिंठा चौकात गणेश मूर्ती विक्रेत्यांनी तीन दिवसांपासूनच आपली दुकाने थाटायला सुरुवात केली. गुरूवारी अजिंठा चौफुलीपासून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.गौरीचे मुखवटेही तयारगणपती पाठोपाठ गौरी, महालक्ष्मी देखील येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मुखवट्यांची आणि मुर्त्यांची देखील तयारी केली जात आहे. यात शाडू मातीची मुर्ती आणि मुखवटे, स्टॅण्ड, बाळाच्या मुर्त्या, कापडापासून बनवलेली मुर्ती देखील उपलब्ध आहे. त्यासोबतच पाऊले देखील मुर्तीकारांनी बनवली आहेत. शाडुमातीचे दोन मुखवटे, आणि बाळ जवळपास १३०० रुपयांना तर पीओपीमध्ये १४०० ते १७०० रुपयांना उपलब्ध आहेत.मूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात मूर्तीकार व्यस्तगणेशोत्सवाचा दरवर्षी वाढत जाणारा भाविकांचा उत्साह पाहता, उत्सवाच्या दोन ते तीन महिन्यांआधीच मूर्तीकार मूर्ती बनविण्यास सुरुवात करतात. त्यानुसार शनिवारी विराजमान होणाºया बाप्पाच्या मूर्तींवर शेवटच्या हात फिरविण्यास मूर्तीकार व्यस्त असून त्यांचे रात्रंदिवस काम सुरू आहे. तयार झालेल्या मूर्ती विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या खरेदीला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीJalgaonजळगाव