शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाजारीकरणामुळे उत्तम नाटकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:47 IST

विजयकुमार सैतवाल। जळगाव - मराठी नाट्यनिर्मितीसाठी सातत्य आवश्यक आहे. कारण कालचा काळ आज नसतो. मराठी रंगभूमीवरील मापदंड जेथे आहे, ...

विजयकुमार सैतवाल।जळगाव - मराठी नाट्यनिर्मितीसाठी सातत्य आवश्यक आहे. कारण कालचा काळ आज नसतो. मराठी रंगभूमीवरील मापदंड जेथे आहे, तेथेच आहे. आज सामाजिक आशय व धार्मिकता यांची सांगड नाही की राजकारणावर नाट्य लेखन होत नाही. केवळ बाजारीकरण वाढत असल्याने उत्तम नाट्य निर्मिती होत नाही व त्यातून उत्तम अभिनयही घडून येत नाही, अशी खंत लेखक व नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नाट्यलेखन कार्यशाळेच्या निमित्त गज्वी हे जळगावात आले होते. त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचित केली. या वेळी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेले हा संवाद...प्रश्न- आजच्या तरुण पिढीमध्ये नाट्य गुण दिसून येतात का?उत्तर- उत्तम नाट्य निर्मितीसाठी आंगीक, आहार्य, वाचिक, सात्वीक या नाटकासाठीच्या चार गुणांसोबत तात्वीक गुणही आवश्यक आहे. मात्र तात्वीक भूमिका असलेले नाटक येत नाही आणि दुसरीकडे आजच्या तरुणांना झटपट प्रसिद्धी हवी आहे. अलौकिकतेसाठी कष्ट हवे असतात. मात्र तेच आज दिसत नाही.प्रश्न- आजच्या नाटकांमध्ये समकालील प्रश्न दिसून येतात का?उत्तर - नाही. १९७५मध्ये आणीबाणीचा विषय असो की, जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्मितीचा विषय किंवा बाबरी मशिद पाडली, मुंबई बॉम्बस्फोट, भारत-पाकिस्तान संबंध यावर कोणते नाटक आले? समकालीन प्रश्नांना घेऊन नाट्य निर्मिती होण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास आवश्यक असतो.अभिरुची बदलावीपूर्वीपासून ज्या पद्धतीने नाट्य निर्मिती होते, तीच परंपरा आज कायम आहे. विरोधात जाऊन लेखन करायला कोणी तयार नाही. प्रेक्षकांनीही अभिरुची बदलून नवीन नाटक स्वीकारायला हवे. त्यातून नवीन रंगभूमी तयार होऊ शकेल.परिवर्तनशील लेखननाट्य क्षेत्रात जो कष्ट करतो, तोच टिकतो. हलके-फुलके लिहायला कष्ट लागत नाही. आज देशाबद्दल एवढ्या आत्मीयतेने बोलले जाते, मात्र ते लिखानात का येत नाही. त्याबद्दल कोठे नाटक दिसते. तरुण पिढी झटपट प्रसिद्धीच्या मागे लागते, मात्र ही झटपट प्रसिद्धी त्याच गतीने विस्मृतीत जाते. चिरकाल नाट्यनिर्मिती व आपला ठसा उमटविण्यासाठी परिवर्तनशील लेख असणे गरजेचे आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव