शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

दुस-या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

By सागर दुबे | Updated: March 25, 2023 15:10 IST

गायत्री नगरातील घटना; रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी...

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : मेहरूण परिसरातील गायत्री नगरात दुस-या मजल्यावरून पडून कैलास बाबुराव महाजन (४२, रा.नशिराबाद) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

कैलास महाजन हे नशिराबाद येथे आई-मुलासह वास्तव्यास होते. बगिच्याची कामे करणारे ठेकेदार प्रकाश मराठे यांच्याकडे ते कामाला होते. मराठे यांनी गायत्री नगरातील एका बंगल्यातील काम घेतले होते. त्यामुळे कैलास हे शनिवारी सकाळी कामाला आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक बंगल्याच्या दुस-या मजल्यावरून पडून ते त्यांच्या हाता-पायाला तसेच डोक्याला दुखापत होवून गंभीर जखमी झाले. इतर मजुरांना ही घटना दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना वाहनातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले.

मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती महाजन यांना मृत घोषित केले. यावेळी मराठे यांच्यासह महाजन यांच्या नातेवाईकांची रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास विकास सातदिवे आणि ललित नारखेडे हे करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव