शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बोढरे येथील सोलर पीडित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोरसिंग राठोड यांनी घेतली सोलर पीडितांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 14:41 IST

भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंग राठोड हे १७ रोजी सोलर पीडित शेतकऱ्यांंच्या भेटीसाठी बोढरे गावात आले असता, मोठ्या संख्येने तरुण, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनींनी, वाजत-गाजत, जल्लोषात स्वागत केले व गावातून काढली भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देजल्लोषात स्वागतग्रामस्थांनी घेतली भव्य जाहीर सभा

चाळीसगाव, जि.जळगाव : भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंग राठोड हे १७ रोजी सोलर पीडित शेतकऱ्यांंच्या भेटीसाठी बोढरे गावात आले असता, मोठ्या संख्येने तरुण, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनींनी, वाजत-गाजत, जल्लोषात स्वागत केले व गावातून काढली भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्यापुढे अन्यायाचा पाढा वाचला.पीडित शेतकरी न्यायापासून वंचित असल्याचे भीमराव जाधव यांनी मोरसिंग राठोड यांच्या यावेळी निदर्शनास आणून दिले. पीडित शेतकºयांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या व्यथा समजून घ्यावेत यासाठी राठोड हे बोढरे गावात आले होते.सभेत राठोड यांनी सांगितले की, माझ्या समाजावर अन्याय करणाºयांना कदापि माफी नाही. १२०० ऐकर जमिनी स्वस्तात लाटण्याºया कंपन्यांनी वेळीच सर्व पीडित शेतकºयांना कायदेशीर एकसमान योग्य तो मोबदला द्यावा अन्यथा प्रकल्प राहणार नाही. शेतकरी दोन वर्षांपासून न्यायासाठी झटत आहे, राज्य मंत्री राठोड यांच्याकडे तीन वेळा बैठका झाल्या. चौकशी अहवाल गेला तरी न्याय मिळत नसेल तर मग आपण आपल्या परीने न्याय देण्यास भाग पाडू. समाजातील लोक विविध पक्षात काम करत असतील हरकत नाही परंतु आपण जर समाजाला न्याय देत नसाल तर समाजाच्या नावाखाली त्या पक्षात लाचारवश राहू नका. सत्तेचा दुरूपयोग करून शेकडो एकर जमिनी सोलर कंपन्यांनी गैरमार्गाने कवडीमोल भावात हडप केल्या. एकाही नेत्याने आहे त्या पक्षात आवाज का बरे उचलला नाही. जीव धोक्यात घालून भीमराव जाधव व सहकारी लढताहेत. एकाही पक्षांनी याची दखल घेतली नाही. परंतु आता लक्षात ठेवा पीडित शेतकºयांच्या पाठीशी भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाची साथ असणार आहे. समाजासाठी झटणाºया कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली तर गाठ मोरसिंग राठोडशी राहील, अशी धमकी देत या प्रस्थापितांना सत्तेची मस्ती आली आहे म्हणून हे अशाप्रकारे शेतकºयांवर अन्याय करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.सूत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले. सभेस पृथ्वीराज चव्हाण, अंकुश राठोड, रमेश चव्हाण, रूंदन चव्हाण, राहुल चव्हाण, नवनाथ चव्हाण, धारासिंग राठोड, राम जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

टॅग्स :FarmerशेतकरीChalisgaonचाळीसगाव