शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मस्करी नको करू बोलल्याचा राग आल्याने तरूणावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:33 IST

शिरसोली येथील घटना : तरूण गंभीर जखमी ; जिल्हा रूग्णालात झाली शस्त्रक्रिया

जळगाव- दीपकची मस्करी नको घेऊ असे, बोलल्याचा राग येऊन पन्ना उर्फ पद्माकर प्रभाकर धनगर याने विजय गंगाराम गवळी (वय-२५, रा़ शिरसोली) या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरसोली गावात घडली़ पोटात गंभीर दुखापत झाल्यामुळे विजय याला त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली़विजय गवळी हा शिरसोली येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे़ शनिवारी रात्री तो कुटूंबीयांसह पुण्याला जाणार होता़ मात्र, त्यापूर्वी वडीलांनी बचत गटाचे १ हजार ३१० रूपये संबंधित व्यक्तीला देऊन ये असे सांगितले़ त्यानुसार विजय हा मित्र दीपक पुंडलिक भील आणि गणेश भगवान बारी यांच्यासोबत दुचाकीने पैसे देण्यासाठी निघाला़ दरम्यान, मित्राला तंबाखू घ्यायची असल्यामुळे गावातीलच एका पान टपरीजवळ विजयने दुचाकी थांबविली़ त्याचवेळी पन्ना धनगर त्याठिकाणी आला व त्याने दीपक याची मस्करी घेऊन शिविगाळ करायला लागला़ त्यावर विजय याने दीपकची मस्करी नको घेऊ असे, सांगताच पन्ना याने विजयला शिविगाळ करण्यास सुरूवात केली़ नंतर हातातील चाकूने डाव्या हातावर वार केला़चाकूने पोटात केला वारहातावर चाकूचा वार होताच विजय हा जखमी झाला़ नंतर पन्ना याने त्याच्या हातातील चाकूने विजयच्या पोटात दोन वेळा वार करत त्यास गंभीर जखमी केली़ पोटात गंभीर इजा झाल्यामुळे रक्तस्त्राव होण्यास सुरूवात झाली़ व तो खाली कोसळला़ नंतर पन्ना हा तेथून पसार झाला़ग्रामस्थांनी नेले जिल्हा रूग्णालयातविजय हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेला ग्रामस्थांना आढळून आला़ तेव्हा योगेश लावणे, हेमंत पाटील तसेच विजय कोल्हे, भैय्या न्हावी यांच्यासह ग्रामस्थांनी त्यास त्वरित उचलून वाहनातून जिल्हा रूग्णालयात नेले़ दरम्यान, चाकू हल्ला झाल्याची गावात बातमी पसरताच सर्वत्र खळबळ उडाली़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव