शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

अकलूद येथे तरुणावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 15:30 IST

केवळ विचारलेला मोबाइल नंबर न दिल्याचा राग आल्यावरून एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना अकलूद, ता.यावल येथे रविवारी सकाळी आठ वाजता घडली. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुकलाल काशिनाथ भिल (वय २२) असे असून, चाकूहल्ला करणारा सतीश रमेश सपकाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे दोघे चुलत भाऊ आहेत.

ठळक मुद्देमोबाइल नंबर न दिल्याचा राग आल्याने केलाहल्लाआरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

फैजपूर, जि.जळगाव : केवळ विचारलेला मोबाइल नंबर न दिल्याचा राग आल्यावरून एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना अकलूद, ता.यावल येथे रविवारी सकाळी आठ वाजता घडली. चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुकलाल काशिनाथ भिल (वय २२) असे असून, चाकूहल्ला करणारा सतीश रमेश सपकाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे दोघे चुलत भाऊ आहेत.आरोपी सतीश सपकाळे याने सुकलाल भिल याच्याकडे त्याच्या साडूचा मोबाइल नंबर मागितला होता. मोबाईल नंबर न दिल्याने त्याचा राग येऊन सतीशने सुकलाल याच्या पोटावर चाकूने वार केला. या घटनेने अकलूज गावात एकच खळबळ उडाली होती. सुकलाल याला तातडीने भुसावळ येथे उपचारार्थ दाखल करून त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आरोपी सतीश सपकाळे ह्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून घटनेत वापरलेला चाकूसुद्धा हस्तगत केला आहे.जखमी सुकलाल भिल याच्या तक्रारीवरून सतीश सपकाळेविरुद्ध भा.दं.वि. ३०७ प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि दत्तात्रय निकम, फौजदार जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार विकास कोल्हे करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFaizpurफैजपूर