शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे पतंग व मांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:33 IST

मुक्ताईनगर येथे पतंग व मांजा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देमुक्ताईनगर पोलिसांची कारवाईमांजावर न्यायालयाने घातली बंदी

विनायक वाडेकर

मुक्ताईनगर : घातक व जीवघेणा असलेल्या मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या शहरातील पूनम कलेक्शनमध्येे मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकला. यात पतंगासह १९२० रुपये किमतीचा  मांजा जप्त करण्यात आला.मकरसंक्रातींच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर होतो. मांजा नायलॉनचा असल्यामुळे गळ्यात व शरीरात अडकून अनेकांचा त्यात जीव गेला आहे. गेल्या आठवड्यात नाशिक शहरात रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकून जीव गेला होता. अत्यंत घातक असलेल्या या मांजाच्या विक्रीला शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही शहर व जिल्ह्यात मांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने धाडसत्र राबविण्याचे आदेश सोमवारी दिले. याबाबत मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यात पो. कॉ. गोपीचंद  सोनवणे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, सोमवारी दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी मुक्ताईनगर येथील पूनम कलेक्शन या दुकानात छापा टाकला. तेव्हा त्या  ठिकाणी प्लास्टिक कागदाचे पतंग व  मांजाच्या ५० चकऱ्या, ३६० रुपये किमतीचा मांजा, २०० रुपयांच्या लहान चकऱ्या असा एकूण एक हजार ९२० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. याआधी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कैलास भरासके, पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळुंके, सहायक फौजदार सादिक पटवे, देवेंद्र काटे तांनी शहरातील अर्धा डझन दुकानांची तपासणी केली. त्यात एका दुकानात घातक मांजा आढळला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मानव, व्यक्ती, सजीव, प्राणी यांची व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती केल्याबद्दल अनिल पूनमचंद संचेती यांच्यावर भाग सहा, गुन्हा रजिस्टर नंबर पाच/ २०१२, भा.दं.वि. कलम १८८ व ३३६  तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सादिक पटवे हे करीत आहेत.

न्यायालयाने घातली बंदीघातक मांजाच्या विक्रीस बंदी घालण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून त्याआधारावर न्यायालयाने बंदी घातली आहे.  

नायलॉन मांजावर बंदी आहे. त्यामुळे विक्रेते असो की पतंग उडविणारे कोणीही मांजाचा वापर करू नये. संपूर्ण जिल्ह्यात मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नागरिकांनीही या जीवघेण्या मांजाचा वापर करू नये. कुठे विक्री होत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती कळवावी.-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMuktainagarमुक्ताईनगर