शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

काकांच्या पुतळ्याच्या कार्यक्रम, राऊतांचा...! गुलाबरावांचा मुखवटा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला किशोर पाटलांनी रोखले

By सुनील पाटील | Updated: April 23, 2023 18:54 IST

हा कार्यक्रम काका आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचा आहे. त्याला गालबोट नको. आजचा दिवस त्यांचा आहे, उर्वरित ३६४ दिवस आपले आहेत. संजय राऊत यांचा हिशेब नंतर चुकता करु, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली.

जळगाव : उध्दव ठाकरे यांच्या सभेत घुसण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुखवटे व बाहुबलीची प्रतिमा घेऊन निघालेल्या शिंदे सेनेला आमदार किशोर पाटील यांनी जळगाव शहराच्या बाहेरच रोखले. हा कार्यक्रम काका आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचा आहे. त्याला गालबोट नको. आजचा दिवस त्यांचा आहे, उर्वरित ३६४ दिवस आपले आहेत. संजय राऊत यांचा हिशेब नंतर चुकता करु, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली.

 पाचोऱ्यातील उध्दव ठाकरे यांच्या सभेत घुसण्याची भाषा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली होती. दगड मारुन सभा, आंदोलन उधळणारे आम्ही आहोत असे बोलून गुलाबरावांनी ठाकरे गटाला आव्हान दिले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी युटर्न घेत आधी सेना जाते व नंतर सरदार जातो अशी भूमिका घेतली होती. पिंप्राळ्यातील शिवस्मारक भूमीपुजन सोहळ्याला भेट देऊन उध्दव ठाकरे पाचोऱ्याकडे रवाना झाले. सायंकाळी होणाऱ्या त्यांच्या सभेत घुसण्यासाठी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख नीलेश पाटील हे समर्थकांसह पाचोऱ्याकडे निघाले. सर्वांनी गुलाबरावांचे मुखवटे घातले होते तर बाहुबलीच्या वेशात गुलाबरावांचा चेहरा एक असलेले कटआऊट त्यांच्यासोबत होते. शहराच्या बाहेर निघताच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेटस‌् लावून त्यांना अडवले. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील तेथे दाखल झाले. आजचा हा कार्यक्रम घरातील आहे. काकांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागू नये अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे तुम्ही येथून माघारी फिरा अशी विनंती पाटील यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही माघारी फिरल्याचे नीलेश पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

तेव्हा ठाकरेंनी आर ओ पाटलांकडे फिरुन पाहिले नाहीआर. ओ.पाटील मुंबईत ५२ दिवस रुग्णालयात होते. त्यावेळी मी व बहिणी वैशाली यांनी उध्दव यांना हकिकत सांगितली. मातोश्रीवर गेलो. पण ते दवाखान्यात भेटायला आले नाहीत. अपमान केला. कधी फिरुन पाहिले नाही. निधनानंतर सांत्वनपर साधा फोन केला नाही. असे असताना गुणवान बापाची पोरगी यांच्यासोबत जाऊन कळवट शिवसैनिक असल्यासारखी दाखवित असल्याची खंत किशोर पाटील यांनी व्यक्त केली. राहिला संजय राऊत यांचा विषय...त्यांचा हिशेब नंतर चुकता करु असे ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv SenaशिवसेनाJalgaonजळगाव