शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

किसान एक्सप्रेस शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:16 IST

शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद वाढल्यास फेऱ्यांमध्ये होणार वाढअगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंग

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शेतकºयांच्या मालाला कमी वेळेत योग्य भाव मिळावा तसेच कोरोना काळात माल सहजरीत्या बाजारपेठेत पोहोचावे याकरिता रेल्वे प्रशासनाने ७ आॅगस्टपासून किसान एक्सप्रेस दर शुक्रवारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी हे आशेचे किरण असून मोठ्या प्रमाणात शेतकºयांकडून प्रतिसाद मिळाल्यास किसान एक्सप्रेसच्या फेºयांमध्येसुद्धा वाढ होणार आहे.कोरोनाचा परिणाम सर्व व्यवसायावर झाला आहे. शेतकºयांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळावा, वेळेवर माल पोहोचावा याकरिता रेल्वे प्रशासनाने खास शेतकºयांसाठी किसान एक्सप्रेसची सुरुवात केली आहे. ७ आॅगस्टपासून दर शुक्रवारी किसान एक्सप्रेस गाडी क्रमांक ००१०७ डाऊन देवळाली-दानापूर येथून सुटते. अवघ्या तीन फेºयांमध्ये शेतकºयांकडून लाखो टन माल कमी भाड्यात पोहोच करत शेतकºयांसाठी मोठे वरदानच ठरत आहे.अगदी एक किलोपासून तर अमर्याद मालाची होते बुकिंगकोरोना काळामध्ये दिवसागणिक डिझेलचे भाव वाढल्यामुळे साहजिकच सर्व दळणवळणाचे भाव वाढले. शेतकºयांसाठी माल इतर राज्यांमध्ये पोहोचणे हे न परवडणारे होते त्यातल्या त्यात इतर राज्यांमध्ये माल पाठवायचा झाल्यास त्यासाठी कमीत कमी ४-५ टन माल असणे आवश्यक असते मात्र रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या किसान एक्सप्रेसमध्ये शेतकरी आपला माल अगदी एक किलोपासून तर अमर्याद बुक करू शकतो.एका टनाला भुसावळ ते देवळाली ३४५० प्रमाणे दर आकारले जातात तर प्रति किलोला साडेतीन रुपये दर आकारला जातो.३० तासात पोहोचतो मालभुसावळ विभागातून देवळाली, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बºहाणपूर, खंडवा या सात स्थानकावर गाडीला थांबे देण्यात आले आहेत. जळगाव येथे रात्री ९:५५ वाजता गाडी येते तर भुसावळ स्थानकावर गाडीची वेळ रात्री १०:४५ ची वेळ आहे. गाडी स्थानकावर साधारण २० मिनिटे थांबते. माल बुक केल्यानंतर अवघ्या ३० तासांमध्ये माल हा दानापूर येथे हमखास पोहोचतो. अचूक वेळ ही या गाडीची विशेषत: आहे.वेळ, पैसा, प्रदूषणाची होते बचतट्रान्सपोर्टेशनने माल बुक केल्यानंतर माल पोहोचायला साधारण चार ते पाच दिवस लागतात. एका ट्रकमध्ये माल लोड करण्याची ठरावीक क्षमता असते. मात्र किसान एक्सप्रेस मध्ये अमर्याद माल आपण बुक करू शकतात, याशिवाय ट्रान्सपोर्टद्वारा माल बुक केल्याने जास्त पैसे मोजावे लागतात. शिवाय ५० ट्रकचे काम एकाच गाडीद्वारे होते. यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही.शेतकºयांच्या मागणीनुसार किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्यंतदेवळाली ते दानापूर जाणारी किसान एक्सप्रेस शेतकºयांच्या मागणीनुसार दानापूरच्या पुढे ७० किलोमीटर मुजफ्फरपूरपर्यंत वाढविण्यात आली आहे.गाडीचे वाढवले डबेपहिल्या फेरीमध्ये फक्त गाडीला १० डबे जोडण्यात आले होते. यानंतर सोलापूर, पुण्याच्या शेतकºयांच्या मागणीनुसार सोलापूर येथून पाच तर पुणे येथून दोन डबे गाडीला जोडण्यात आल्याने १७ डब्यांची किसान एक्सप्रेस मुजफ्फरपूरपर्र्यंत धावत आहे.दरम्यान, पहिल्या फेरीमध्ये ९१ टन, दुसºया फेरीत १०० टन व तिसºया फेरीत सुमारे १५६ टनापेक्षा जास्त माल किसान एक्सप्रेसद्वारा शेतकºयांनी बुक करून दर फेरी गणिक किसान एक्सप्रेसला शेतकºयांकडून प्रतिसाद मिळत आहे.शेतकºयांनी किसान एक्सप्रेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कमी वेळेमध्ये, कमी दरात माल बुकिंग होते. आपल्या मालाला नियोजित वेळेस बाजारपेठेत उपलब्ध करू शकतो. शेतकºयाकडून प्रतिसाद मिळाल्यास गाडीच्या फेºयांमध्ये वाढ करण्यात येईल.- युवराज पाटील, सीनियर डीसीएम, मध्य रेल्वे, भुसावळ विभाग.