आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. ४ - बोहरी पेट्रोल पंपाचे मालक अली अजगर बोहरी (५५) यांची गावठी पिस्तुलने गोळी झाडून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.अमळनेर शहराच्या माध्यवर्ती भागात असलेला बोहरी पेट्रोल पंप बंद करुन अली अजगर हे दुचाकीने घरी निघाले होते. पंपापासून दीडशे फूटापर्यंत गेल्यावर तिघा-चौघांनी त्यांना हेरले आणि जवळून त्यांच्या छातीखाली एक गोळी झाडली. क्षणातच अज्ञात हल्लेखोर पसार झाले. जखमी बोहरी दुचाकीने पंपावर आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांना घटना समजली. त्यांनी बोहरी यांना रिक्षाने दवाखान्यात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.दुचाकीच्या डिकीतील रोकड सुरक्षित असून वैयक्तिक वादातून बोहरी यांचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अमळनेरात गोळी झाडून पेट्रोल पंप मालकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 12:02 IST