शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे येथून जळगावला मुलांच्या भेटीसाठी आलेला तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:21 IST

वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यातून मार्गक्रमण करीत असताना मागून आलेल्या दहा चाकांच्या कंटनेरने जोरदार धडक दिल्याने अनिल छगन नन्नवरे (वय ३२, रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता बांभोरी गावाजवळ सावली वसतीगृहासमोर घडली. अनिल हा नारायणगाव, पुणे येथे एस.टी.महामंडळात चालक होता.

ठळक मुद्दे  जळगावनजीक बांभोरीजवळील घटना    पुणे येथे एस.टी.महामंडळात चालककंटेनरने दिली धडक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यातून मार्गक्रमण करीत असताना मागून आलेल्या दहा चाकांच्या कंटनेरने जोरदार धडक दिल्याने अनिल छगन नन्नवरे (वय ३२, रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता बांभोरी गावाजवळ सावली वसतीगृहासमोर घडली. अनिल हा नारायणगाव, पुणे येथे एस.टी.महामंडळात चालक होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी बांभोरी पुलाजवळ मालवाहू चारचाकी गाडी पंक्चर झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दीड तासाने वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु केली होती. त्यावेळी अनिल नन्नवरे हा पाळधी येथून दुचाकीने येत असताना एकेरी वाहतुकीतून मार्गक्रमण करताना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटनेरने (क्र.एम.एच.४० वाय.४५३१) अनिल याला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो दुचाकीच्या खाली पडला. डोक्याला मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. गावाजवळच हा अपघात झाल्याने गावकºयांनी तातडीन घटनास्थळी धाव घेतली. गावातीलच तरुण ठार झाल्याने गावकरी आक्रमक झाले. मुलांच्या भेटीसाठी आला...अनिल हा दोन वर्षापूर्वी नारायणगाव, पुणे आगारात चालक म्हणून नोकरीला लागला होता. मुलगा मोहीत व मुलगी लक्ष्मी यांची शाळा सुरु होणार असल्याने त्यांच्या भेटीसाठी तो सोमवारीच घरी आला होता. याच काळात भावाच्या मुलीचाही वाढदिवस होता.मंगळवारी मुलांसाठी कपडे व दप्तर घेतले. सायंकाळी घरी गेल्यानंतर कामानिमित्त पाळधी येथे गेला होता. बुधवारी तो पुन्हा पुणे येथे जाणार होता, तत्पूर्वीच ही दुर्घटना घडली. दरम्यान, अनिल याच्या पश्चात आई, पत्नी कल्पना, दोन मुले,तीन भाऊ असा परिवार आहे. वडीलांचे निधन झाले आहे.  

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा