शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपहरणाचा बनाव आला बापाच्या अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:51 IST

मुलाच्या अपहरणाचा बनाव बापाच्या अंगलट आला असून, सरपंचाशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बापाने खोटी फिर्याद दिल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. ही घटना सार्वे, ता.पाचोरा येथील आहे.

ठळक मुद्देपाचोरा तालुक्यातील सार्वे येथील प्रकारभांडणाचा वचपा काढण्यासाठी खोटी तक्रार

भडगाव, जि.जळगाव : मुलाच्या अपहरणाचा बनाव बापाच्या अंगलट आला असून, सरपंचाशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बापाने खोटी फिर्याद दिल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. ही घटना सार्वे, ता.पाचोरा येथील आहे.सूत्रांनुसार, ६ रोजी मुलगा गणेशचे अपहरण झाल्याची तक्रार ८ रोजी मुलाचे वडील विजय आधार पाटील यांनी दाखल केली होती. मात्र विजय पाटील यांनी मुलाला कपडे घेण्यासाठी कजगावला एकटे बसविले होते. नंतर शोधाशोध केली असता मुलाचा तपास लागला नाही, अशी तक्रार पोलीस स्टेशनला मुलाचे वडील विजय पाटील रा.सार्वे यांनी दिली होती. दरम्यान, ही तक्रार देण्याआधी विजय पाटील यांनी मुलाला स्वत: वाडी, ता.शिरपूर येथील मित्र सतीश शांताराम दुध्येकर यांच्याकडे सोडले. यानंतर गावातील सरपंचाशी झालेल्या भांडणात त्यांना या प्रकरणात कसे अडकवायचे असे विचार विजयच्या डोक्यात सुरू होते. याबाबत आरोपी विजयची पत्नी, आई, चुलता यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता ही बाब लक्षात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. यानंतर पोलीस पथक शिरपूर येथे गेले व मुलाला घेऊन भडगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मुलाला आई मनीषाबार्इंच्या ताब्यात दिले. मुलाचे अपहरणाचा हा बनाव स्वत: बापानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहीती पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली याबाबत १५ रोजी विजय आधार पाटीलविरुद्ध कलम ३६५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, विजय पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhadgaon भडगाव