खिरोदा, ता. रावेर : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित सप्तपुट ललित कला भवन संचलित अनुदानित चित्रकला महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
फाउंडेशन विभागात प्रथम क्रमांकाने श्रुती भावसार, द्वितीय- विशाखा निवतकर, तृतीय- अक्षय धनगर, तसेच प्रथम वर्ष एटीडीमध्ये प्रथम- कल्याणी राजेंद्र महाजन, द्वितीय- रिता जैन, तृतीय- सेजल पाटील व जी.डी. आर्ट पेंटिंगला इंटरमिजिएट जी.डी. आर्ट पेंटिंग प्रथम क्रमांक विवेक रोकडे, डिप्लोमा जी.डी. आर्ट पेंटिंगला प्रथम क्रमांक धनश्री, द्वितीय- नितीन रतनसिंग पवार आला.
या सर्वांचे संस्थाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, सचिव प्रभात चौधरी, प्राचार्य अतुल मालखेडे व प्रा. दिनेश पाटील यांनी कौतुक केले.