शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

श्वाश्वत सिंचनावरीलच खरीप तरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 23:32 IST

उत्पादन जेमतेम, पण इस्राईल देशालाही मागे टाकणारे शेतकºयांचे व्यवस्थापन

ठळक मुद्देकपाशीचे क्षेत्र सर्वाधिकपावसाच्या टक्केवारीचे गौडबंगाल...!फक्त पावसावर उत्पादनाचे धाडससिंचन क्षेत्र नगण्य

खेडगाव, ता. भडगाव - यावर्षी पावसाळ्यातील चार महिन्यात मोजून चार तारखांना फक्त २०-३० मि.मी. पाऊस पडूनही काही शेतकºयांचा हंगाम आला़ मात्र अधिक दिवसाचा पावसाचा खंड उत्पादनासाठी मारक ठरला़ यात ठिबक संच, जलयुक्त शिवारांतर्गत नालाबांध व गिरणा नदी काठ अशा सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रातील खरीप तरला आहे.तालुक्यात २६००० हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. त्या खालोखाल मका ३००० हेक्टरवर, ज्वारी-बाजरी १५०० हेक्टरवर, कडधान्य १२०० हेक्टरवर, तर बागायतीत केळी-ऊस, फळबागायत २००० हेक्टरवर जवळजवळ आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे आहे़ हंगामात हलक्या जमिनीवरील पीक हलके पडले. तर भारी जमिनीवरील ज्वारी-बाजरी व मक्याचे उत्पादन ४०-५० टक्के इतके घटले.पावसाळ्यात मृग नक्षत्रात सुरुवातीला, त्यानंतर १४-१८ जुलै, २४-२६ जुलै, १९-२० आॅगस्ट व २०-२१ सप्टेंबरदरम्यान चारच तारखांना दोन आकडी पाऊस झाला. शेतीदृष्ट्या २० ते ३० मि.मी. पुढचा पाऊसच लाभदायक असतो, मग या चार तारखांचा पाऊस मोजल्यास तो मंडळपरत्वे १२० ते १५० मि.मी.च भरतो. शासकीय मोजमापानुसार ३०० ते ३५० मि.मी. पाऊस तालुक्यात झाला. कधी ४ मि.मी तर कधी ८-९ मि.मी. हा फक्त अंगावरील कपडे ओले करणारा पाऊस शेतीसाठी कुचकामी ठरतो. तो ग्राह्य धरावा का? हा प्रश्नच आहे़ मग पावसाच्या टक्केवारीनुसार इस्राईल देशालाही मागे टाकत विनाठिबक संचाशिवाय शेतकºयांनी खरीप बहरवला. फक्त रसशोषक किडींचा प्रादुर्भाव व पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशीचा हंगाम काहीसा हातून निसटला. कपाशीचे पीक प्रमुख असल्याने, यावरच शेतकºयांची आर्थिक मदार आहे. त्यामानाने या पिकासाठी सिंचन सुविधा येथे मात्र नाही, तरीदेखील पावसाचे जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात दोन मोठे खंड पडूनही शेतकºयांनी आंतरमशागत, रासायनिक खतांच्या योग्य मात्रा, संजीवकाच्या फवारण्या यातून पीक शेतात बहरवले. प्रतिकूल हवामानात रसशोषक किडींचा व अळींचा उपद्रव वाढला़ त्यातच श्वाश्वत (ठोस) सिंचनाची सोय नसल्याने शेतकºयांची थोडी पंचाईत झाली. अन्यथा इस्राईल देशालाही लाजवेल असे व्यवस्थापन शेतकºयांनी ठेवले. जुवार्डी, आडळसे या अवर्षण प्रवण भागात तर कपाशीत ठिबक संच असूनही विहिरीत पाणी नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ खरिपातील कपाशी या पिकासाठी फक्त १०-२० टक्के क्षेत्रात या वेळेस सिंचन सुविधा उपलब्ध होती. इतरत्र विहिरींना पाणी नसल्याने गिरणा नदीकाठ, नालाबांध, ठिबक संच बसविलेल्या क्षेत्रातील खरीप तरला.सुरुवातीला खरीप हंगाम दृष्ट लागण्यासारखा होता. मात्र पीकवाढीच्या अवस्थेत पावसात खंड पडला, पीक हिरवे राहिले पण कपाशीची फुलपाती गळून उत्पादन घटले व आता कपाशी लाल पडू लागल्याने फरदडची सोय उरली नाही.-प्रदीप महाजन, कोळगाव ता. भडगाव.सिंचनाची सोय असलेल्या जमिनीवर खरीप हंगाम चांगला आला़ तर इतरत्र जेमतेमच आहे.-ताराचंद चव्हाण, नालबंदी, ता. भडगाव.