शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील नुकसान भरपाई, १२ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 10:26 IST

कापूस उत्पादकांना ५ हजार रुपयांचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्यावर्षी झालेल्या खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार  जळगाव जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार कापूस उत्पादकांना, तर १२ हजार सोयाबीन उत्पादकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. 

याबाबतचा शासनाचा निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला असून ई-पीकपेरा केलेले सर्व कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी या अर्थसाहाय्यासाठी पात्र राहणार आहेत. गेल्यावर्षी राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील सरासरीहून कमी पाऊस झाला होता. यासह पिकांवर रोग पडल्याने खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान, खरीप हंगाम संपून वर्ष उलटून गेल्यावर शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळाला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना गेल्यावर्षी झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात येणार आहे. ०.२ हेक्टरपेक्षा  अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५००० रुपये अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

यादी जाहीर, नावं नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी...

  • शासनाकडून जी यादी जाहीर झाली आहे, त्यात अनेक शेतकऱ्यांची नावे नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. ई-पीकपेरा जरी ग्राह्य धरण्यात आला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी तलाठ्यांच्या माध्यमातून पी कपेऱ्याची नोंदणी केली होती. 
  • मात्र, या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. 
  • काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात शेतात जाऊन मोबाइल ॲपद्वारे संबंधित पिकाचा ऑनलाइन पेरा नोंदविला होता. शासन योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंद महत्त्वाची असल्याने शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीकपेरा नोंदविला होता. 
  • मात्र, तरी देखील अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. सोयाबीन उत्पादकांना  ५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

अनुदानासाठी  संमतीपत्र गरजेचे

  • कापूस व सोयाबीन उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीकपेऱ्याची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना रक्कम दिली जाणार आहे. 
  • आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी द्द्यावी.  शेतकऱ्यांनी संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना-हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाकडे सादर करावे. 
टॅग्स :Soybeanसोयाबीनcottonकापूस