शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

खारघर दुर्घटना: विधीमंडळाचे अधिवेशन बोलवा, निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करा: आमदार शिरीष चौधरी

By सुनील पाटील | Updated: April 24, 2023 17:51 IST

सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना २५ लाखाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यासाठी १३ कोटी रुपये खर्च केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : खारघर दुर्घटनेला सरकार जबाबदार असून याची तीन निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यास राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करतानाच या घटनेत मृताचा आकडा १४ दाखविण्यात आलेला असला तरी प्रत्यक्षात ही संख्या त्यापेक्षा जास्त असल्याचा दावा प्रदेश कॉग्रेसचे उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांनी सोमवारी कॉग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांना २५ लाखाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यासाठी १३ कोटी रुपये खर्च केले. राज्यभरातून श्री सदस्यांना भर उन्हात थांबवून त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याचीही सोय केली नाही. आमच्यामागे महाराष्ट्राची किती मोठी ताकद आहे, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दाखविण्याचा हा प्रयत्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केला. शहा भाषण करीत असताना तेथे रुग्णवाहिका येत होत्या व जखमींना नेत होते, मात्र स्वत: एसीत बसणाऱ्या व्यासपीठावरील कोणीच त्याकडे पाहिले नाही. उष्माघातासह चेंगराचेंगरी झाल्याने त्यातही काहींचा मृत्यू झाल्याचा दावा आमदार चौधरी यांनी केला. अशा घटनांमध्ये तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले जातात, मग येथे आयोजकांवर का गुन्हे दाखल केले नाहीत. सरकारच आयोजक असल्याने कदाचित हा कायदा त्यांच्यासाठी लागू नसावा असा टोलाही त्यांनी लगावला. मृत्याच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत देण्याचे जाहिर करणे म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष श्याम तायडे आदी उपस्थित होते.

राजकीय भांडवल कसे होऊ शकते

या घटनेचे राजकीय भांडवल करु नये असे आवाहन आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे. मात्र झालेली दुर्घटना कशी नाकारता येईल. भांडवल कसे होऊ शकते असा सवाल आमदार शिरीष चौधरी यांनी केला. माझा वापर करण्यात आला, सत्ताधाऱ्यांना मते देऊ नका अशा पोस्ट धर्माधिकारी यांच्या नावाने व्हायरल होत आहेत, मात्र ही पोस्ट नक्कीच त्यांची नाही, त्यांच्या नावाने दुसरेच कोणी हा प्रकार करीत असल्याचेही चौधरी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jalgaonजळगाव