शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडा देशी नं १... साईनगरीत खान्देशी कोंबडीची ‘पक पक पकाक पक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 17:38 IST

प्रदर्शनात अव्वल : ‘सातपुडा देशी’ने जिंकला ‘महापशुधन एक्स्पो’

कुंदन पाटील

जळगाव : ‘पक पक पकाक पक’ करीत पशुतज्ज्ञांचे स्वागत करणाऱ्या ‘सातपुडा देशी’ वाणाच्या कोंबडीने साईनगरीतले ‘महापशुधन एक्स्पो’ जिंकले आहे. ‘सातपुडा देशी’ या जातीची कोंबडीने साईनगरीतही सात्त्विक तोरा कायम ठेवला आणि कुक्कुट गटात अव्वल येण्याचा मान मिळविला.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शिर्डी येथे २४ ते २६‎ मार्च या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ चे‎ आयोजन करण्यात आले होते. या पशु प्रदर्शनात राज्यातील व राज्याबाहेरील अंदाजे जातीवंत‎ गाय-म्हैस वर्गीय ,कुक्कुट वर्गीय पक्षी, अश्व‎ जातीची १२७० जनावरे सहभागी झाले होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने कुक्कुट गटात ‘सातपुडा देशी’ कोंबडीला सहभागी केले होते. या प्रदर्शनात तज्ज्ञांद्वारे परिक्षण करण्यात आले. वाढीचा वेग चांगला, अधिक अंडी उत्पादन क्षमता, चांगली रोग प्रतिकार क्षमता असलेल्या ‘सातपुडा देशी’ जातीची कोंबडी कुक्कुटपालन व्यवसायासाठी सर्वाधिक लाभदायी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच परसातील कुक्कुटपालनासाठी ही योग्य जात असल्याचे मत तज्ज्ञांनी

नोंदविले. त्यानंतर जाहीर झालेल्या निकालात अव्वल ठरलेली खान्देशी कोंबडी ‘पक पक पकाक पक’...करीत गावाकडे परतली आहे.प्रसार, प्रचारासाठी प्रयत्न सातपुडा कोंबडी पालनासाठी स्थानिक लोकांची मागणी जास्त आहे, त्यामुळे अंडी उबवण केंद्रांची संख्यावाढीसाठी वाव आहे. भविष्यामध्ये या कोंबडीच्या गुणविशेषांचा प्रसार, प्रचार व बाजारपेठेची उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातील, असा सूर यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केला.

खरंतर ही गावरान जात आहे.खूप पौष्टिकता आणि सात्त्विकता जपणारी ही सातपुडा देशी कोंबडी. तिच्या गुणधर्मामुळेच तिने प्रदर्शन जिंकले आहे.-डॉ.शामकांत पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव