शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे खंडेराव महाराजांची यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:46 IST

खंडेराव महाराज मंदिरात यात्रा महोत्सवानिमित्त खंडेराव महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देमहोत्सवानिमित्त पालखी सोहळा‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा नाम गजर

पारोळा, जि.जळगाव : डी.डी.नगर भागातील पुरातन खंडेराव महाराज मंदिरात यात्रा महोत्सवानिमित्त खंडेराव महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.पालखीत खंडेराव महाराज यांच्या चांदीच्या मूर्ती ठेवून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नाम गजरात हा पालखी सोहळा पार पडला. राम मंदिर चौकातून सुधाकर चौधरी, लोटन चौधरी यांच्या घरून गावातून थेट डी.डी.नगर भागात पालखी मिरवणूक वाजतगाजत काढण्यात आली.सकाळी ९ वाजता निघालेली खंडेराव महाराज यांची पालखी दुपारी १ वाजता मंदिरात पोहोचली. या ठिकाणी तळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नामागजरात उठविण्यात आली. परिसरातील भाविकांनी महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती. वरण, भात, भट्टी, गुळाचा शिरा असा मेनू या महाप्रसाद होता. सुधाकर व लोटन चौधरी यांनी महाप्रसादाचे नियोजन केले. यंदा ग्रामविस्तार अधिकारी डी.बी.पाटील यांची मनोकामना खंडेराव महाराज यांनी पूर्ण केल्याने त्यांनी सपत्नीक सत्यनारायणाची पूजा केली होती.खंडेराव महाराज हे मंदिर आधी पाच पावलीचे मंदिर म्हणून ओळखले जात असे. हे पुरातन मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात कुस्त्यांच्या मोठ्या दंगली यात्रेनिमित्त होत असत. पण रहिवास वाढला. गावातील मल्ल कमी झाले आणि या कुत्यांच्या दंगलीही मागे पडल्या. सन १९९९ साली मधुकर बडगुजर यांनी स्वखर्चाने या खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व या मंदिराला जुने पुरातन रूप दिले. या यात्रा महोत्सवासाठी सुधाकर चौधरी, लोटन चौधरी, मधुकर बडगुजर, प्रा.डी.एन.सूर्यवंशी, चंदूलाल डागा, डी.बी.पाटील, एस.डी.पाटील, ए.टी. पाटील, रावसाहेब भोसले, आर.एम.बोरसे, एस.डी.पाटील, अरुण पाटील, भटेसिंग गिरासे, मधुकर पाटील, लक्ष्मण सरदार, एस.आर.पाटील, छोटू पाटील, जळगाव येथील सचिन माळी आदींनी परिश्रम घेतले.रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमParolaपारोळा