शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Eknath khadse : खडसेंचा गौप्यस्फोट... फडणवीसांच्या सांगण्यावरुनच माझ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

By महेश गलांडे | Updated: October 21, 2020 14:59 IST

Eknath khadse : माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, भाजपावर आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर मी नाराज नाही. माझी नाराजी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे.

ठळक मुद्देएका महिलेने विनयभंगाची खोटी तक्रार माझ्याविरुद्ध केली होती. अंजली दमानिया यांनी माझ्यावर हा आरोप लावला, त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर गोंधळ घातला.

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडण्याची घोषणा केली आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले आहे. फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट खडसेंनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करत असताना खडसे यांचा गळा भरून आला होता. 

'नाथाभाऊंचा निर्णय त्यांच्यासाठीच अत्यंत दुर्दैवी, आता दिल्या घरी सुखी राहावं'

माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, भाजपावर आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर मी नाराज नाही. माझी नाराजी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. मी येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत किती आमदार, खासदार आहेत असे विचारले असता खडसे यांनी सांगितले की, माझ्यासोबत एकही आमदार किंवा खासदार नाही. मी एकटाच राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. रक्षा खडसे ह्या भाजपामध्येच राहणार आहेत. तसेच, माझं चारित्र्यहनन करण्यापर्यंत काही जणांनी डाव आखल्याचं सांगत खडसेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. 

'त्या' क्षणापासून भाजपमध्ये माझा छळ सुरू झाला; खडसेंच्या डोळ्यात दाटून आले अश्रू 

एका महिलेने विनयभंगाची खोटी तक्रार माझ्याविरुद्ध केली होती. अंजली दमानिया यांनी माझ्यावर हा आरोप लावला, त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर गोंधळ घातला. याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेथील पोलीस निरीक्षकांनीच मला याबाबत माहिती दिली, ते म्हणाले स्वत: मुख्यमंत्र्यांनीच गुन्हा दाखल करायला सांगितलंय. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांच्याकडे जाऊन यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी, त्या महिला रात्रभर गोंधळ घालत होत्या, त्यामुळे गुन्हा दाखल करायला लावलं. पुन्हा मागे घेऊयात, असं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. याप्रकरणामुळे माझी मोठी बदनामी झाली, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरुद्ध राजकारण केलं गेलं, म्हणून मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं खडसेंनी सांगितलंय. 

Eknath Khadse: राष्ट्रवादाचा बुरखा घातलेल्या राष्ट्रवादीत गेल्यानं मी निःशब्द, भाजपची पहिली प्रतिक्रिया

दिल्या घरी सुखी राहावं

राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावासाहेब दानवेंनी म्हटले आहे. 

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, वो जाने वाले हो सके तो लौट के आना.. असे म्हटले आहे. मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे. तसेच पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असं मला वाटतं. पक्षाला खडसेंसारखा नेता, ज्यांनी 40 वर्षे पक्षांची सेवा केले ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढचं म्हणू शकतो, ओ जानेवाले हो सके तो लौट के आना.. असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिलीय. 

भापाकडून खडसेंना शुभेच्छा

केशव उपाध्ये म्हणाले की, कोणताही नेता अथवा कार्यकर्ता पक्षातून बाहेर पडतो त्याचा आनंद निश्चित नसतो. एकनाथ खडसेंवर अन्याय झाला की नाही हा व्यक्तिसाक्षेप निर्णय असू शकतो, प्रदेशाध्यक्ष सातत्याने एकनाथ खडसेंच्या संपर्कात होते, संघटनेला कोणताही त्रास होणार नाही असा निर्णय होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, परंतु एकनाथ खडसेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे खडसेंच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा. संघटनेने एकनाथ खडसेंसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं भाजपानं स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्या कुटुंबात आल्याचं स्वागत -मुख्यमंत्री

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आनंद आहे. त्यांचे महाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत खडसे बांधणार राष्ट्रवादीचं घड्याळ

एकनाथ खडसेंनी भाजपाचा त्याग केलेला असल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalgaonजळगावMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी