जळगाव : कवीवर्य ना. धो. महानोर यांच्या पत्नी सुलोचना नामदेव महानोर (७८) यांचे अल्पशा आजारने शुक्रवारी दुपारी १२ वाजता पळसखेड ता. सोयगाव येथे निधन झाले. अंत्यसंस्कार शुक्रवार रोजी संध्याकाळी ४ वाजता पळसखेड़ा ता. सोयगाव येथे होणार आहेत. त्यांच्या पश्चात पती नामदेव महानोर, मुलगा डॉ. बाळासाहेब महानोर, गोपाल महानोर सुना, नांतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर जळगावात उपचार सुरु होते. त्यांना जळगाव येथून पळसखेडे येथील शेतात नेण्यात आले. तिथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.
कवीवर्य ना. धो. महानोर यांना पत्नी सुलोचना महानोर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 15:02 IST