शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चंपारण्यात कस्तुरबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:34 IST

गांधीजींच्या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यामागे कस्तुरबांनी आपली आंतरिक शक्ती उभी केली. त्यांनी चळवळीत केवळ ‘मम’ म्हणून सहभाग नोंदविला नाही. त्या कृतीशील सहकारी राहिल्या. चंपारण्यात कस्तुरबांची खूप वेगळी वेगळी रूपं बघायला मिळाली. ५०-५० लोकांचा स्वयंपाक करणाºया कस्तुरबा, शिक्षिका कस्तुरबा, स्वच्छतेचा व्रत देणाºया कस्तुरबा आणि गांधींची शक्ती बनून दशांगुळे उरलेल्या कस्तुरबा गांधीजी आणि ...

गांधीजींच्या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यामागे कस्तुरबांनी आपली आंतरिक शक्ती उभी केली. त्यांनी चळवळीत केवळ ‘मम’ म्हणून सहभाग नोंदविला नाही. त्या कृतीशील सहकारी राहिल्या. चंपारण्यात कस्तुरबांची खूप वेगळी वेगळी रूपं बघायला मिळाली. ५०-५० लोकांचा स्वयंपाक करणाºया कस्तुरबा, शिक्षिका कस्तुरबा, स्वच्छतेचा व्रत देणाºया कस्तुरबा आणि गांधींची शक्ती बनून दशांगुळे उरलेल्या कस्तुरबा गांधीजी आणि कस्तुरबांच्या सहजीवनाचे मनोरम चित्र चंपारण्यात दिसते. इतिहासाला ललामभूत असणारा स्वातंत्र्य लढ्याचा हा इतिहास कस्तुरबांच्या आठवणींनी भावसमृद्ध झालेला आहे. बिहारचा लढा गांधी चळवळीत अनेक सत्याग्रही साधकांना जोडणारा ठरला. त्या झगमगत्या अध्यायाचे हे पृष्ठ.निळीचा सत्याग्रह सुरू झाला. गांधीजींना बिहारात शिक्षणाचा अभाव दिसला. पोरे गावात उनाडक्या करत. टिवल्या-बावल्या करत हिंडत. नुसतीच फिरत. त्यांनीे शाळा चालवायचे ठरवले. शिक्षक मिळेनात. त्याना पदवीधारी शिक्षक नको होते. जीवनधारी शिक्षक हवे होते. त्यानीे कस्तुरबावर ही जबाबदारी सोपवली. ती काही शिकलेली नव्हती. तिच्या मनाचा कोंडमारा होत असायचा. पहिल्या भेटीपासून गांधीजींनी तिला शिकायचा आग्रह धरला होता. ‘शिकून घे कस्तूर’, असे सांगितले होते. आपण लक्ष दिले नाही. आपले चुकले हा बोध तिला सतत होत राहिला होता. आपण मागे राहिलो. आपण त्याच्या आग्रहाला मान का नाही दिला? तिचे मन तिला जाब विचारू लागले होते. ती हिरमुसली. चार बायका जमल्यात. यातल्या साºया बायका शिकलेल्या होत्या असे नव्हते. एकदा तर तिने गांधीजींना विचारले, ‘हे बघा, मी शाळेत शिकवण्याचे काम कसे बरे करावे? मला ना लिहिता येतं, ना वाचता येतं. मी शाळेचा उंबरठादेखील कधी ओलांडलेला नाही.’ यावर शांतपणे गांधीजी उत्तरले की, त्याना हे सारे ठाऊक आहे. ‘मग मी काय करेन? ‘या कस्तुरबाच्या प्रश्नावर गांधीजी म्हणाले, ‘तू शाळा झाडून काढशील. शाळा सारवून टाकशील. स्वयंपाक करशील. तू या मुलांना शिकवायचे कामही करशील. ते समजून घे.’ हे ऐकल्यावर कस्तुरबा बोलल्या, ‘पण मला बापडीला स्वत: तरी कुठे येते लिहायला वाचायला? मी काय शिकवणार?’ गांधीजी म्हणाले, ‘अगं मुलाना लिहायला शिकवायचे नाही. वाचायला शिकवायचे नाही. व्याकरण शिकवायचे नाही. गणित शिकवायचे नाही. त्याना जगायला शिकवायचे. परसाकडेहून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. सकाळी दात घासावेत. नखे काढावीत. नाक शिंकरावे. जेवणापूर्वी हात धुवावेत. केसांवर कंगवा फिरवावा. ही रीतभात शिकवायची आहे.’गांधीजींच्या या निवेदनाने ती खूश झाली. ती अभिमानाने त्यांच्याकडे बघत होती. त्याना कधीही कुठलीही अडचण अशी ती येतच नाही. ती कामाला लागली. गावोगावी हिंडली. लोकांना समजावू लागली. वाटेल तिथे थुंकू नये. रस्त्यात लघवी करू नये. चुकीच्या सवयी बदलायला हव्यात. रोज कचरा गोळा करावा. गाव स्वच्छ ठेवावा. झाडू कसा बनवावा? विहिरी कशा स्वच्छ ठेवाव्यात? सांडपाणी कसे वहाते ठेवावे? व्यक्तिगत आरोग्य कसे राखावे? हे सारे ती समजावून सांगत होती. (क्रमश:)- प्रा.डॉ. विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव