कढोली, ता. एरंडोल : कढोली परिसरात शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी सभापती मोहन सोनवणे, सरपंच किरण कोळी, प्रवीण पाटील,विलास पाटील व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
शंभर लाभार्थ्यांना
मदतीचे वाटप
फोटो
जामनेर : गेंदाबाई निराधार योजनेंतर्गत शहरातील शंभर लाभार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे वाटप उद्योगपती ईश्वरलाल कोठारी यांच्या हस्ते
करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून योजना सुरु असून त्याचा लाभ गरजूंना दिला जातो. कोठारी यांनी योजनेचे कौतुक केले.यावेळी विनोद लोढा, ताराबाई कोठारी, शीतल लोढा, मुकेश बोहरा व संचालक उपस्थित होते.
भाजप ओबीसी मोर्चाच्या
प्रदेश चिटणीसपदी सोनवणे
फोटो
अमळनेर : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीसपदी अमळनेरच्या भारती सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे
झालेल्या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.