शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १२ मिनिटात कापड दुकान फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:08 IST

बळीराम पेठेतील घटना : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, मात्र डीव्हीआर लांबविले

जळगाव : शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बळीराम पेठेतील यु.जी.रेडीमेड गारमेन्ट हे कापडाचे दुकान फोडून चोरटयंनी तिजोरीत ठेवलेले साडे तीन लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. अवघ्या १२ मिनिटात चोरट्यांनी आपले काम फत्ते केले आहे. दरम्यान, दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राम गंगूमल कटारिया (५५,रा. गणेश नगर) यांचे भाजपा कार्यालयाच्या मागे असलेल्या बळीराम पेठेत शेरू अ‍ॅण्ड टॉवरच्या पहिल्या मजल्यावर यु.जी.रेडीमेड गारमेन्ट म्हणून दुकान आहे. या दुकानावर गेल्या दोन महिन्यांपासून दोन कर्मचारी तर दोन दिवसांपासून दोन असे एकुण चार कर्मचारी कामाला आहे.रविवारी सकाळी फर्निचर कामासाठी मिस्तरी दुकानात आले असता त्यानां दुकान फोडल्याचे लक्षात आले. मिस्तरींनी दुकानदार राम कटारिया यांना घटनेची माहिती दिली. कटारिया दुकानावर आले असता त्यांना तिजोरीत ठेवलेले ३ लाख ६५ हजार रूपयांची रोकड गायब झालेली दिसली तर तिजोरी फोडलेली होती.सीसीटीव्हीचे डीव्हीआरही लांबविलेदुकान मालकांनी पहिल्या मजल्यावर लावलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील चोरट्यांनी तोडून लंपास केले आहे. दरम्यान इमारतीवर जाण्यासाठीच्या जिन्याला लावलेल्या कुलूपही तोडून त्यांनी आत प्रवेश केला होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावेळी दोन चोरटे रात्री १.२३ चोरी करण्यासाठी आत प्रवेश करत दुकान फोडून अवघ्या १२ मिनीटात चोरी करून रोकड लंपास केली आहे.कटारीया यांनी शहर पोलीसांना घटनेची माहिती दिली व घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. दरम्यान दुकानावरील काम करणाºया कर्मचारी यांच्याशिवाय इतरांना तिजोरीत रक्कम असल्याचे माहिती नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव