००००००००००००००००००००००००००००
साधना हॉस्पिटल येथे नेत्र तपासणी शिबिर
जळगाव : साधना हॉस्पिटल येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिराचा २०० रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय सखोल पद्धतीने सर्व रुग्णांची डोळ्यांची तपासणी केली गेली. साधना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शिबिरातील रुग्णांना सुद्धा सुपरस्पेशालिटी सेवा दिली. डोळ्यांच्या तपासणी आणि उपचाराच्या उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ.रश्मी सौरभ पाटील
यांनी सांगितले. माफक दरात योग्य शस्रक्रिया व उपचारासाठी रुग्णांनी साधना आय हॉस्पिटल, प्लॉट नं. ४४९ विवेकानंद नगर, आंबेडकर मार्केट जळगाव, येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पीपल्स बँकेत नेतृत्व विकास शिबिर
जळगाव : नाबार्ड व दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गट सदस्यांकरिता नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम बुधवार दि.११ रोजी घेण्यात आला. कार्यक्रमास होमा फार्मिंगचे तज्ञ ब्रुस जॉन्सन, बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट समाधान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नाबार्डचे सहा.महाव्यवस्थापक श्रीकांत झांबरे, बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील व माजी चेअरमन व संचालक भालचंद्र पाटील हे उपस्थित होते. सूत्र संचालन बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी केले.
फोटो कॅप्शन: कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी डावीकडून शुभश्री दप्तरी, संजय पाटील, श्रीकांत झांबरे, ब्रुस जॉन्सन, भालचंद्र पाटील, समाधान पाटील, अनिकेत पाटील.