शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दागिने पॉलीश करताय, सावधान, वशीकरणाचेही प्रकार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:36 IST

भांडी आणि दागिने पॉलिशच्या नावाने घातला जातोय गंडा

सुनील पाटील जळगाव : घरी येवून कोणी तुमची भांडी व दागिने पॉलिश करुन देण्याचे सांगत असेल तर, वेळीच सावध व्हा..कारण पॉलिशच्या बहाण्याने महिलांना बोलण्यात गुंतवून सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना भुरळ घालून सोन्याचे दागिने पळविण्याऱ्या टोळ्या राज्यात सक्रीय झाल्या आहेत.जळगाव शहरात दोन दिवसापूर्वीच अशी एक घटना घडली. भांडी पॉलिश करुन देण्याच्या नावाखाली महिलेला गुंतवून पायातील चांदीचे पैंजन लांबविण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्याआधीही शहरात अशा घटना घडल्या असून राज्यभर हे प्रकार सुरु आहेत.लाखो रुपयांचे दागिने काही मिनिटात लांबविले जात आहेत.काय खबरदारी घ्याल... घरात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश देवू नये. भांडी पॉलिश करायची गरजच असेल तर फक्त भांडीच काढून द्या..मात्र यावेळी घरात एक किंवा दोन पुरुष असावेत. दागिने शक्यतो बाहेर किंवा घरी आलेल्या व्यक्तीकडून पॉलिश करुच नका. सराफाच्या दुकानातच जावून दागिने पॉलिश करा तसेच भांडीही दुकानातच जावून पॉलिश करा. घरी आलेल्या व्यक्तीकडून भांडी व दागिने पॉलिश करुच नका. दरम्यान, अशी संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.अशा आहेत काही ठळक घटनापॉॅलिश करण्याच्या बहाण्याने हर्षा राजेंद्र जंजाळकर (४०, रा.मेहरुण, जळगाव) यांचे चांदीचे जोडवे लांबविण्यात आल्याचा प्रकार १५ आॅक्टोबर रोजी घडला होता.हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने लोकांनी कैलास साह (२९, रा.मधेपूर, बिहार) याला पाठलाग पकडले होते.गेल्या वर्षी ९ मे २०१८ रोजी मुक्ताईनगरातील एमएमआयटी महाविद्यालय परिसरात इंदूबाई गोविंद चौधरी (६०) यांचे ८५ हजाराचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते.वंदना शरदचंद्र काबरा (६७, रा.पाचोरा) या वृध्देचेही १८ जानेवारी २०१८ रोजी साडे चार लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले होते. पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोघांनी हे दागिने लांबविले. परप्रांतीय तरुणांचाच समावेश असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.औषध टाकण्याचाही फंडासोन्याच्या दागिण्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून सीलबंद डब्यात दागिने टाकून त्यात काहीतरी औषध टाकले जाते. पंधरा ते वीस मिनिटांनी डबा काढून घ्या व सोन्याची चमक बघा असे सांगितले जाते. सांगितल्याप्रमाणे चमक पाहिली असता डब्यात दागिने नसल्याचे आढळून येते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशी फसवेगिरी करणारे शक्यतो दुचाकीने येतात..दुचाकीवर क्रमांक नसतो, असलाच तर बनावट असतो व शक्यतो दुचाकी घरापासून लांब अंतरावर पार्कींग केली जाते.काय आहे गुन्ह्याची पध्दतदुचाकीवरुन किंवा चालत आलेल्या दोघं तिघांकडून घराची टेहाळणी केली जाते. एकटी महिला किंवा वृध्दा अशा ज्या महिला घरात असतात तेथे हे संशयित जातात. घरात कोणीही पुरुष व तरुण मुलगा नसल्याची खात्री झाल्यावर या महिलांना हेरले जाते. सुरुवातील पाणी पिण्याचा बहाणा केला जातो. पाणी प्यायल्या नंतर ताई, तुमच्या घरातील भांडी पॉलिश करायची आहेत का? कमी किमतीत भांडी पॉलिश करुन देतो असे सांगून महिलांना तयार केले जाते.महिलेच्या अंगावर दागिने दिसले की तुमचे दागिनेही पॉलिश करुन देतो..त्यांच्या समोरच काही दागिने पॉलिश केले जातात.नंतर घरातून गरम पाणी अथवा कोणतीही वस्तू आणायला लावतात. महिला घरात गेली चोरटे दागिने घेऊन पसार होतात. घरातून महिला येत नाही, तोपर्यंत चोरटे गायब झालेले असतात.वशीकरणाचाही एक प्रकार आहे. महिलांना बोलण्यात गुंतवले जाते. त्यांच्यासमोरच भांडी पॉलिश करीत असताना अंगावरील दागिने केव्हा काढले जातात, हे त्या महिलेच्याही लक्षात येत नाही. हे भामटे निघून गेल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी महिलेच्या लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.शक्यतो घरी आलेल्या व्यक्तीकडून भांडी असो कि दागिने पॉलिश करुच नये. अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नका. असा काही संशयास्पद प्रकार वाटला तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, त्याआधी जवळ किंवा शेजारच्या लोकांची मदत घ्यावी. जेणे करुन अशा चोरट्यांना पकडणे शक्य होईल व संभाव्य घटना टाळता येतील.-बापू रोहोम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

टॅग्स :Jalgaonजळगाव