शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात वृध्देच्या डोक्यात काठी मारुन लांबविले दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:02 IST

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने वकीलाच्या घरात घुसला ‘ब्रोकर’. पोलिसांनी केली दोघांना अटक

ठळक मुद्देवृद्धा शुध्दीवर आल्यावर उघड झाली घटनाजिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलभरत खंडेलवाल व हर्षल कुळकर्णी या दोघांना पोलिसांनी केली अटक

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १९ : प्लॉट विक्री करायचा आहे का? अशी विचारणा करायला गेलेल्या इस्टेट ब्रोकर व त्याच्या सोबतच्या एका जणाने प्रमिला भास्कर महाजन (वय ८१ रा. प्रताप नगर, जळगाव) यांच्या डोक्यात काठी मारुन पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व बेंटेक्सचे दागिने लांबविल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. जखमी प्रमिला या अ‍ॅड.सतीश महाजन यांच्या आई आहेत.दरम्यान, या घटनेतील वृध्दा रविवारी सकाळी शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या वर्णनावरुन भरत खंडेलवाल (रा. गणेश कॉलनी, जळगाव) व हर्षल कुळकर्णी (रा.यावल, ह.मु.गणेश कॉलनी, जळगाव) या दोघांना १२ तासातच पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अ‍ॅड.सतीश महाजन यांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी प्रमिला महाजन या एकट्याच घरी होत्या. अ‍ॅड.महाजन हे न्यायालयात तर त्यांचे भाऊ संजय महाजन रेल्वे स्टेशनला गेले होते. दुपारी तीन वाजता त्यांच्या घरी दोन जण आले. त्यातील भरत खंडेलवाल याने तुमचा प्लॉट विक्री करायचा आहे का? माझ्याकडे गिºहाईक आहे अशी माहिती प्रमिला महाजन यांना दिली. त्यावर प्लॉट विक्री करायचे नाही असे माझे मुले म्हणतात असे सांगून त्याला नकार दिला.प्रमिला महाजन यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार केल्यावर सायंकाळी त्या शुध्दीवर आल्या. त्यांनी झाल्या प्रकाराची माहिती मुलगा अ‍ॅड.महाजन यांना दिली. मारहाण करणारा व्यक्ती आपल्याकडे यापूर्वी प्लॉटसाठी आलेला होता, त्याच्याशी नातेवाईकानेही व्यवहार केला असून तो ब्रोकर असल्याची माहिती दिल्यानंतर अ‍ॅड.महाजन यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना घटनेची माहिती दिली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा