शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

घरातील तिजोरीतून साडेपाच लाखांचे दागिने चोरी; कुटूंबियांचा मोलकरणीवर संशय

By सागर दुबे | Updated: April 17, 2023 12:25 IST

चोरट्यांचा धुमाकूळ, रात्री नव्हे ; दिवसाही होतायेत घरफोड्या...

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : शहरातील राजमालती नगरातील सुनिता नरेंद्र मोरे यांच्या घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेल्या डब्यातून ५ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, घरात धुणी-भांडी करणा-या महिलेने हे दागिने लांबविले असल्याचा संशय मोरे कुटूंबियांना असून त्यांनी तिच्याविरूध्द शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राजमालती नगरमधील सुनीता मोरे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती आजारी असल्यामुळे ते रेल्वेतून निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी मुलगा हिमांशू हा रेल्वेत नोकरीला लागला आहे. पतीच्या पगारातून शिल्लक राहणाऱ्या पैशातून सुनीता मोरे यांनी बऱ्यापैकी सोन्याचे दागिने केले होते. बचतीच्या पैशांतून घेतलेले सोन्याचे दागिने त्या कपाटातील तिजोरीत पितळी डब्यात सुरक्षित ठेवत होत्या. मात्र, १ एप्रिलला त्यांची मुलगी सायली ही कपाटातील दागिने पहायला गेली, असता तिला डब्यामध्ये दागिने दिसून आले नाही. ही बाब तिने तत्काळ आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वतः सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, १५ दिवस विचारपूस करूनही यश आले नाही.मोलकरणीवर संशय, पोलिसात दिली तक्रार...

सुनीता मोरे यांच्याकडे साधारण तीन महिन्यांपासून धुणी-भांडी आणि घर स्वच्छतेसाठी एक महिला कामाला आहे.  घरातील इंत्यभूत माहिती मोलकरणीला असल्याने मोरे कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केली. मात्र, तिने नकार दिला. अखेर रविवारी मोरे कुटूंबियांनी मोलकरणीविरूध्द शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.चोरीला गेलेला असा आहे ऐवज

चार लाख रुपयांचे १० तोळ्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपयांचे एक तोळ्याचे कानातील टोंगल, १२ हजार रुपयांचे तीन ग्रॅमचे टॉप्स, ८० हजार रुपयांच्या ६ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण पाच लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी