शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे बुधवारी ‘जनसेवक’ सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 19:55 IST

राजकारणासह, सहकार, शिक्षण क्षेत्राची समाजकारणाशी नाळ जोडणारे लोकप्रतिनिधी ‘जनसेवक’ म्हणून आदर्श ठरतात. चाळीसगाव तालुक्यात गेल्या पाच दशकातील याच जनसेवकांचा सन्मान सोहळा बुधवारी अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे५० वर्षात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मानअनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणार उपक्रमसहकार, राजकारण, शिक्षणादी क्षेत्रात काम करणाºयांचा होणार गौरव

चाळीसगाव, जि.जळगाव : राजकारणासह, सहकार, शिक्षण क्षेत्राची समाजकारणाशी नाळ जोडणारे लोकप्रतिनिधी ‘जनसेवक’ म्हणून आदर्श ठरतात. चाळीसगाव तालुक्यात गेल्या पाच दशकातील याच जनसेवकांचा सन्मान सोहळा बुधवारी अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यात राजकीय, सहकार, शिक्षण, समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाºया लोकप्रतिनिधींना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.सन्मान सोहळा ९ रोजी सकाळी ११ वाजता राजपुत लोकमंगल कार्यालयात होईल.कै.देशमुख यांच्यासह तालुक्याच्या जडणघडणीत व गेल्या ५० वर्षात विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेत त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार व्हावा, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनीही यावेळी दिली.तालुक्यातील सहकारी, शैक्षणिक संस्था मध्ये १९७० पासून कार्यरत असलेल्या विविध संस्थांमधील पदाधिकारी राहून आपले योगदान दिलेल्या आजी-माजी संचालक, सभापती, उपसभापती यांचा सन्मान करून त्यांचे आजपर्यंतचे योगदान सामाजापुढे ठेवण्याचा मानस हा सोहळ्याचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, बेलगंगा सहकारी साखर कारखाना, नगरपालिका, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक संस्था, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी यासारख्या संस्थांमध्ये काम केलेला सदस्यांचा सहभाग असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी असतील तर माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी मंत्री तथा पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील ,माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, पाचोºयाचे माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील हे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहे.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील, पंचायत समितीचे गटनेते अजय पाटील, जिभाऊ पाटील, लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, जि. प. सदस्य अतुल देशमुख, भूषण पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष स्वप्नील कोतकर , प्रताप भोसले, सुधीर पाटील, यज्ञेश बाविस्कर, मिलिंद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव